अमेरीकेप्रमाणे रस्‍ते करणार, मग शहरातील रस्‍त्‍यांचे काय; शिवसेनेचा भापजवर निशाणा

जिल्‍ह्यातील रस्‍ते अमेरीकेतील रस्‍त्‍याप्रमाणे, मग शहरातील रस्‍त्‍यांचे काय; शिवसेनेचा भापजवर निशाणा
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी धुळे जिल्ह्याचे रस्ते अमेरिकेच्या दर्जाप्रमाणे असतील अशी घोषणा केली. यानंतर मात्र धुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप (BJP) व विरोधकांमध्ये रस्त्याच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपल्याचे बघायला मिळत आहे. (dhule news Shiv Sena targets BJP after minister nitin gadkari statement)

Dhule News
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड; १ मेपर्यंत मोहिम

गेल्या दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) धुळे दौऱ्यावर आले असता त्‍यांनी आपल्या भाषणादरम्यान धुळे जिल्ह्याचे रस्ते तीन ते चार महिन्यात अमेरिकेच्या दर्जाप्रमाणे असतील अशी घोषणा केली. या घोषणेनंतर धुळे महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपला धुळे (Dhule) शहरातील रस्त्यांच्या अवस्थेवर विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच धुळे महापालिकेवर जेव्हापासून भाजपची सत्ता आली; तेव्हापासून धुळेकर रस्त्यांच्या बाबतीत नरक यातना भोगत असल्याची टीका देखील शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी केली आहे.

सत्‍ताधारी भाजपवर शिवसेनेचा निशाणा

शिवसेनेचे (Shiv Sena) धुळे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी धुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्यामुळे धुळेकर नागरिक हे नरक यातना भोगत असल्याचे म्हणत मंत्री नितिन गडकरी यांनी धुळे जिल्ह्याचे रस्ते हे अमेरिकेच्या दरजेप्रमाणे असतील अशी घोषणा केली. परंतु धुळे शहराच्या रस्त्यांची अवस्था धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतरच अत्यंत दयनीय झाली असल्याची टीका देखील शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

आता महापौरांचीही घोषणा

यावर धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप कर्पे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे, विरोधकांनी केलेले आरोप महापौर करपे यांनी फेटाळून लावत आगामी दोन ते तीन महिन्यांमध्ये धुळे महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्ते हे राज्यातील इतर महापालिकेच्या दर्जाचे पेक्षा उत्तम दर्जाचे असतील असे म्हणत विरोधकांना सध्या टीका करण्याशिवाय दुसरे कामच नाही अशी टीका विरोधकांवर केली आहे.

शहरातील जवळपास 75 टक्के रस्त्यांचे काम पूर्ण झाली असून उर्वरित 25 टक्के रस्त्यांची काम आगामी दोन ते तीन महिन्यात पूर्ण होतील. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सत्ता राज्यात असताना दिलेल्या शंभर कोटी रुपयांचा निधी पूर्णपणे खर्च करून धुळे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांचा दर्जा सुधारून विरोधकांना सडेतोड उत्तर देणार असल्याचे धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप कर्पे यांनी सामटिव्हीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com