Deathbody 
महाराष्ट्र

पाय घसरून युवती नाल्यात वाहिली; दोन तासांनी सापडला मृतदेह

पाय घसरून युवती नाल्यात वाहिली; दोन तासांनी सापडला मृतदेह

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील हरीविठ्ठलनगरात राहणारी १४ वर्षीय मुलगी पाय घसरून नाल्याच्या पडल्याने वाहून गेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon-news-young-girl-slipped-and-fell-into-the-body-was-found-two-hours-later)

कोळन्हावी (ता. यावल) येथील मुळ रहिवाशी व जलगावतील हरीविठ्ठलनगरातील गायत्री सुरेश मिस्तरी (वय १४) असे मयत मुलीचे नाव आहे. गायत्री मिस्तरी ही वडील सुरेश शामराव मिस्तरी आणि आई सिमाबाई मिस्तरी यांच्यासह लहान बहिण सोनू सोबत राहते.

कोणालाच न सांगता घरातून गेली

आज (ता. १७) सकाळी वडील सुरेश मिस्तरी हे अयोध्यानगरात कामावर निघून गेले. तर आई सिमाबाई घरात होत्या. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गायत्री कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. आरएमएस कॉलनीजवळ रामानंदनगरातून येणाऱ्या रस्त्यावरील लागणाऱ्या नाल्याजवळ गायत्री उभी होती. पाय घसरल्याने ती वाहत्या नाल्याच्या पाण्यात पडली.

क्षणात पाण्यात बेपत्ता

सदर प्रकार काही तरूणांच्या लक्षात आला. पण काही करण्याच्या आत गायत्री पाण्यात बेपत्ता झाली. याबाबत रामानंदनगर पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून शोध घेतला असता दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह खंडेरावनगरातील नाल्याजवळ आढळून आला.

अनोळखी म्हणून रुग्णालयात दाखल

सुरूवातीला अनोळखी म्हणून पोलीसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात रवाना केला. गायत्रीच्या गल्लीतील काही तरूणांना लक्षात आली. गायत्रीचे वडील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली व ओळख पटली. गायत्रीच्या पश्चात आई वडील, मनिषा, माधुरी, सरला, दुर्गा आणि सोनू अश्या पाच बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू, सरकारी शाळेची पोलखोल करणं जीवावर बेतलं; धक्कादायक घटनेने खळबळ

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT