Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : विजेचा जोरदार झटका बसल्याने महिलेचा मृत्यू; पाणी भरत असताना घडली घटना

Jalgaon News : सकाळी नळाला पाणी आले असल्याने ईलेक्ट्रीक मोटार लावून पाणी भरत होत्या. मात्र मोटारीने पाणी भरताना काही वेळाने विद्युत पुरवठा खंडीत झाला.

Rajesh Sonwane

जळगाव : पाणी भरत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील आसोदा बाबत घडली. खंडित झालेला वीज प्रवाह अचानक आल्याने सकाळी हि घटना घडली आहे. 

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील आसोदा येथील संगिता मच्छिंद्र कुंभार (वय ४०) असे सदर घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. संगीत कुंभार या आज सकाळी नळाला पाणी आले असल्याने ईलेक्ट्रीक मोटार लावून पाणी भरत होत्या. मात्र मोटारीने पाणी भरताना काही वेळाने विद्युत पुरवठा खंडीत झाला. यामुळे मोटारीचे बटन बंद करण्यासाठी त्या घरात गेल्या. 

संगिता कुंभार यांनी बटन बंद करण्यासाठी गेल्या असतानाच विद्युत पुरवठा सुरू झाला. यामुळे त्यांना विजेचा जोरदार झटका (Electric Shock) बसला. यात त्या जोरात फेकल्या जाऊन पडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटनेनंतर पती मच्छिंद्र कुंभार व ग्रामस्थांनी त्यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषीत केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Mini Kashmir Tourism: महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! विकेंडला निसर्गाच्या कुशीत पार्टनरसोबत घालवा वेळ, रोमॅंटिक ठिकाणी कसं जाल?

विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; तीन नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे

Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

दाताच्या समस्यांवर तगडा उपाय! मीठ - पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांची सूज होईल कमी, असा करा वापर

SCROLL FOR NEXT