Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पत्नीसह तिन्ही मुले तीन महिन्यांपासुन बेपत्ता; तणावातून गृहस्थाचे टोकाचे पाऊल

Jalgaon News : पत्नीसह तिन्ही मुले तीन महिन्यांपासुन बेपत्ता; तणावातून गृहस्थाचे टोकाचे पाऊल

Rajesh Sonwane

जळगाव : तीन महिन्यांपूर्वी पत्नी व मुले सोडून गेले. यानंतर कायम तणावात असलेल्या इसमाने गळफास घेत आत्महत्या (Jalgaon) केल्याची घटना जळगावात उघडकीस आली आहे. मेहरूणच्या रेणूकानगरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस (Police) स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (Maharashtra News)

जळगावातील रेणुकानगरातील संतोष वामन भावसार (वय ४२) असे मयत इसमाचे नाव आहे. ते मेहरुण परिसरातील रेणुकानगरात एकटे राहत होते. त्यांची पत्नी तीन महिन्यांपासून तीन मुलांसहित घर सोडून निघुन गेल्या आहेत. प्लम्बिंग काम करून ते उदरनिर्वाह करायचे. पत्नी गेल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संतोष कौटुंबिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान सोमवारी ते सकाळपासून घराच्या बाहेर पडलेच नाही. यामुळे शेजाऱ्यांनी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास संतोष भावसार यांना आवाज दिला. कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने घरात डोकाऊन पाहिले असता, ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांना दिली माहिती 
यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. संतोष भावसार यांच्या बहिणींना माहिती दिल्यावर त्यांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Moles: कुठे तीळ असल्यावर लक्षमीची कृपा बरसेल? नाक, ओठ की...

Raj Kundra: १५० कोटींचे बिटकॉईन, ईडीने फास आवळला, राज कुंद्राच्या विरोधात चार्जशीट दाखल

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

दहशतवाद कधी थांबेल? भारत तुम्हाला...; पत्रकाराच्या प्रश्नावर पाक पंतप्रधान भडकले, उत्तर न देताच निघून गेले

GK: जगातील पहिली कागदी नोट कोणत्या देशाने बनवली? जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT