महाराष्ट्र

बळीराजा स्वखर्चाने भागवतोय ग्रामस्थांची तहान

शेतकरी राजेंद्र पाटील स्वत:च्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वखर्चाने गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गेल्या २० ते २५ दिवसांपासून करीत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

कळमसरे (जळगाव) : यंदा जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात ऑगस्ट महिना अर्धा झाला, तरीही पाऊस नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी, सर्वत्र पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. वासरे (ता. अमळनेर) येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर येथील शेतकरी राजेंद्र पाटील स्वत:च्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वखर्चाने गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गेल्या २० ते २५ दिवसांपासून करीत आहेत. (jalgaon-news-warse-village-farmer-water-supply-thirst-of-the-villagers-at-his-own-expense)

गावात पाणीटंचाई जाणवू लागल्याने राजेंद्र पाटील यांनी कळमसरे येथील जय बाबारी भक्त परिवाराचे पाण्याचे टँकर मागवून त्याला स्वमालकीचे ट्रॅक्टर जोडून विहिरीतून गावातील प्रत्येक गल्लीत टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. यामुळे तात्पुरती का होईना पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने वासरेकरांना दिलासा मिळत आहे. यामुळे राजेंद्र पाटील यांचे कौतुक होत आहे.

असा केला जातो पाणीपुरवठा

राजेंद्र पाटील यांच्या खेडी रस्त्यावरील शेतात विहीर आहे. त्यांनी शेतात बागायती क्षेत्र कमी करून गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. रोज शेतात जाऊन स्वखर्चाने टँकर भरून आणणे आणि गल्लीत उभे करून नळीच्या साहाय्याने प्रत्येक कुटुंबाला पाणी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे मागील २० ते २५ दिवसांपासून गावातील प्रत्येक गल्लीत यथावकाश पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वत्र पाणी नसल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके कोमेजली आहेत. अशाही परिस्थितीत श्री. पाटील गावात टँकरने पाणीपुरवठा करीत असल्याने त्यांच्या या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

या वर्षी गेले अडीच महिने उलटूनही पाऊस नसल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना, राजेंद्र पाटील यांनी गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

- दीपक पाटील, वासरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT