Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: मुंबई फिरून परतताना गाठले मृत्‍यूने; कार टँकर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

मुंबई फिरून परतताना गाठले मृत्‍यूने; कार टँकर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : मुंबईहून पारोळा येथे येत असताना अवघ्या तीन किमी अंतर असलेल्या वीचखेडा गावांजवळ सकाळी सात वाजेच्या सुमारास टँकर व कार यांच्यात अपघात (Accident) झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली. (Letest Marathi News)

मुंबईहून (Mumbai) पारोळा येत असताना वीचखेडे गावानजीक आशिया महामार्गावर सकाळी सात वाजेच्या सुमारास कार व ट्रॅंकरचा अपघात (Accident News) झाला. समोरून भरधाव वेगाने येत असलेल्‍या टॅंकरने कारला जोरदार धडक दिल्याने यात पारोळा (Parola) नगरपालिकेचा अभियंता कुणाल सौपुरे (वय ३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा) व एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट डॉ. निलेश मंगळे (वय ३५, रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप पवार (वय ३७) हा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

सुटीमुळे मुंबई फिरायला गेले होते तिघे

कुणाल सौपूरे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व दोन वर्षाची लहान मुलगी आहे. पारोळा नगरपालिकेत अभियांता असल्याने सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव होता. तर डॉ. निलेश मंगळे हा उत्तराखंड येथे एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्याचे जुळे दोन मुले आहेत. रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना काळाने घाला घातला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Puja: मंगळवारी कोणाची पूजा करावी आणि काय अर्पण करावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Latur Accident : लातूरमध्ये कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, ४ जण जखमी

Success Story: ४० लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली, आधी IPS नंतर IAS; UPSC परीक्षेत पहिले आलेले आदित्य श्रीवात्सव कोण?

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT