Jalgaon Corporation Saam tv
महाराष्ट्र

रस्‍त्‍यावरील खड्ड्यात सोडली नाव अन्‌ लावले झाडांची रोप; जळगावात राष्‍ट्रवादीचे आंदोलन

रस्‍त्‍यावरील खड्ड्यात सोडली नाव अन्‌ लावले झाडांची रोप; जळगावात आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील रस्‍त्‍यांवरील खड्ड्यात साचलेल्‍या पाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तांबापूर येथे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यात कागदी नाव सोडून तसेच रोपे लावून (Jalgaon News) महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. (jalgaon news tree planted in the pit left on the road Movement in Jalgaon)

जळगाव (Jalgaon) शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील हे खड्डे दिसत होते. मात्र आता पाऊस (Rain) पडल्यानंतर या खड्डयात पाणी साचले असून या खड्ड्यातून वाट काढतांना वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी अपघातही होत आहे. तांबापूर भागात याच खड्डयात विटा वाहणारे ट्रॅक्टर उलटले सूदैवाने जिवीत हानी टळली. तर इतर भागातही किरकोळ अपघात झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिका (Jalgaon Corporation) प्रशासनाविरूध्द तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राष्‍ट्रवादीचे आंदोलन

जळगाव शहर (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगरतर्फे रस्त्यावरील या खड्डयांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तांबापूर भागात पडलेल्या खड्डयांच्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील खड्डे महापालिकेने त्वरीत बुजवावे अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT