Torture Saam tv
महाराष्ट्र

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

चोपडा (जळगाव) : घुमावल बुद्रुक (ता. चोपडा) येथील २५ वर्षीय महिलेस तिच्या राहत्या घरात घुसून व्हिडिओ कॉल करत हे व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या २५ व २७ मार्चला रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत (Police) शुभम पाटील व प्रफुल्ल पाटील (दोघे रा. घुमावल बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (jalgaon news Torture threatening to make the photo viral)

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. २५) शुभम पाटील याने पीडित महिला घरात एकटी असताना (Jalgaon News) अनधिकृतपणे स्वयंपाकघरात प्रवेश केला. त्यानंतर तोंड दाबून व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ व फोटो काढले व ते व्हॉट्सॲपवर टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच, रविवारी (ता. २७) देखील सकाळी नऊला शुभम व प्रफुल्ल पाटील यांनी पुन्हा त्याच पद्धतीने स्वयंपाकघरात घुसून लज्जास्पद कृत्य केले. यावेळी पीडित महिलेने आरडाओरड केल्याने दोघे पळून गेले.

सासू व सासऱ्यांना मारहाण

घटनेबाबत महिलेने पती, सासू व सासऱ्यांना सांगितले. त्यानंतर सासू, सासरे जाब विचारण्यासाठी गेले असता, दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून चोपडा (Chopda) ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण तपास करीत आहेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi : नागपुरात येऊन राहुल गांधीचं आरएसएसला आव्हान, संविधान सन्मान संमेलनात हल्लाबोल, काय म्हणाले?

Stroke: चेहरा तिरकस होणं, तोल जाणं...; स्ट्रोकची लक्षणं तुम्हाला माहितीये का? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

Buldhana News : पोलिसांकडून ४ लाखाची रक्कम जप्त; आडत्यांकडून खरेदी विक्री बंद, शेतकऱ्यांचा महामार्गावर चक्का जाम

Maharashtra News Live Updates : सोन्याचे भाव जसे वाढतात, तसे भविष्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार - छगन भुजबळ

IPL 2025 Auction: केएल राहुल ते रिषभ पंत.. या खेळाडूंना लय डिमांड; बेस प्राईज 2 कोटी, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT