minor girl Torture Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: फोटो काढून ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

फोटो काढून ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : औरंगाबाद रेाडवरील सुप्रीम कॉलनीच्या विस्तारीत भागातील कपडे घेण्यासाठी येत असल्याने अल्पवयीन मुलीशी ओळख केली. नंतर अत्याचार करत पीडितेस ब्लॅकमेलिंग करत असल्याने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी (Police) संशयीताला अटक केली आहे. (jalgaon news Torture of a minor girl by taking a photo and blackmailing her)

जळगावातील (Jalgaon) फुले मार्केट येथे सोळा वर्षीय मुलगी कपडे खरेदीसाठी येत- जात असताना तिच्याशी दिपक सोनवणे याने ओळख करुन मैत्री केली. मैत्रीनंतर या मुलीशी सलगी करत फुले मार्केट येथे अत्याचार करण्यात आले. नंतर काही दिवसांनी संशयिताने त्याच्या काकाच्या घरी मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील कखनाटुके ईथळ या गावी नेऊन सलग अत्याचार करुन मोबाईलमध्ये फोटो, व्हिडीओ काढले.

बदनामीची धमकी

याबाबत वाच्यता केली तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेल. भेटण्यास नकार दिला तर तुझे फोटो व्हायरल करुन बदनामी करेल, अशी धमकी दिल्याने गेल्या दोन वर्षापासून मुलगी अन्याय सहन करत होती. मात्र, प्रकरण हाताबाहेर जात असल्याने अखेर पीडितेने कुटूंबीयांना आपबिती कथन केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद होऊन संशयित दीपक सोनवणे याला अटक करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT