मृत्यू
मृत्यू 
महाराष्ट्र

मुलाच्या मृत्यूचा धक्का; आईनेही सोडले प्राण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : येथून जवळच असलेल्या थेरोळा (ता. मुक्ताईनगर) येथील तरुण मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्याने दुसऱ्या दिवशी आईनेही प्राण सोडला. या धक्कादायक घटनेमुळे गावासह पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (jalgaon-news-therola-village-young-man-death-and-moher-death-after-one-day)

थेरोळा (ता. मुक्ताईनगर) येथील शेतमजुरी करणारा अत्यंत प्रामाणिक विजय जनार्दन पाटील (वाघमारे) (वय ३५) याचा सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास मेंदूतील नस चोकअप झाल्याने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. मात्र, तरुण मुलाच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने आई सुभाबाई जनार्दन पाटील (वय ७०) यांचे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले. या घटनेमुळे थेराळा गावावर शोककळा पसरली आहे.

विजय पाटील हा दररोज शेतमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करत होता. मात्र, त्याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्युमुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्याला सहा वर्षांचा मुलगा आहे. विजय अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचा होता.

शेतमजुरी करून ओढत संसाराचा गाडा

विजय व त्याची पत्नी अर्चना हे दोघे रोज सोबतच शेतमजुरी करून संसाराचा रहाटगाडा गुण्यागोविंदाने हाकत होते. दोन्ही जण आणि मुलगा अलोक त्यांच्या संसारात खूप आनंदी राहत असत. शेतकऱ्यांची कामे प्रामाणिकपणे करीत असत. मात्र, नियतीने वेगळा डाव साधून अचानक मेंदूतील वाहिनी बंद झाल्याने विजयचा मृत्यू ओढावला. त्यामुळे पत्नी अर्चनासह कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं

Nawazuddin Siddiqui Birthday : मेडिकल केमिस्ट- वॉचमॅन ते सुपरस्टार; जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा संघर्षमय प्रवास

Today's Marathi News Live: मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला भीषण आग

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

SCROLL FOR NEXT