Jalgoan ZP Saam tv
महाराष्ट्र

मुक्‍या बापाची याचनाही प्रशासनासमोर हरली; कॅन्‍सरग्रस्‍त मुलगा व त्‍या बापाची करूण कहाणी

मुक्‍या बापाची याचनाही प्रशासनासमोर हरली; कॅन्‍सरग्रस्‍त मुलगा व त्‍या बापाची करूण कहाणी

Rajesh Sonwane

जळगाव : शाळेत शिपाई असताना दोन वर्षांपासून पगार होत नाही. मुलाला कॅन्‍सरने ग्रासले असताना याबाबत वारंवार तक्रार करूनही माध्‍यमिक शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. यामुळे कॅन्‍सरग्रस्‍त मुलाला न्याय मिळावा, या मागणीसाठी वडिलांनी शिक्षण उपसंचालकांसमोर हात जोडून विनवणी केली. परंतु, या मुक्या बापाची याचनाही प्रशासनासमोर हरल्‍याचे दिसतेय. कारण तब्‍बल चार महिन्‍यानंतर बिल मंजुरीसाठी नाशिक विभागीय कार्यालयाकडे रवाना झाले असून त्‍याचीही अद्याप प्रतीक्षा आहे. (jalgaon news The tragic story of a cancer stricken son and his father)

जळगाव (Jalgaon) शहरातील राजेंद्र वामन जोशी यांची २०१९ मध्ये नूतन मराठा महाविद्यालयाच्‍या हातेड (ता. चोपडा) येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात बदली झाली. तेथे जोशी रूजूही झाले. मात्र, २०१९ पासून आजपर्यंत पगारच मुख्याध्यापकाने काढला नाही. याबाबत माध्‍यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे दोन वर्षांपासून केलेल्या तक्रारींची दखल घेतली नाही. अशात जोशी यांना कॅन्सरने ग्रासले. पगार नाही, तरीही जोशी यांचा लढा सुरू आहे. आता तर ते खाटेवर खिळले आहेत. तरी देखील प्रशासनाला पाझर फुटलेला नाही.

बिल १५ मार्चला रवाना

राजेंद्र वामन जोशी या कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन ते अडीच वर्षाचे थकीत पगाराचे बिल जळगाव वेतन भविष्यनिर्वाह निधी अधीक्षक श्री. शर्मा यांच्याकडे दाखल केले आहे. सदर बिलाची रक्कम १३ लाख ८३ हजार ८०४ रुपये असून ही रक्कम आहे. ही रक्‍कम मिळावी याकरीता राजेंद्र जोशी यांचे वडील शिक्षण उपसंचालक हे १० डिसेंबरला जळगावी आले असताना हात जोडून याचना केली होती. तेव्‍हा त्‍यांना तात्‍काळ बिल मंजुरीचे आश्‍वासन दिले. परंतु, आज चार महिने उलटून गेले असून हे बिल मंजुरीसाठी जळगावहून अधीक्षक वेतन व भविष्यनिर्वाह निधी यांनी शिक्षण उपसंचालक नाशिक (Nashik) विभाग नाशिक यांच्याकडे १५ मार्चला पाठवलेली आहे. तसेच शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांनी २९ मार्चला शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे मंजुरी करता पाठवलेले आहे.

मंजुरीची प्रतिक्षाच

या परिस्थितीत सदर कर्मचारी गेल्या आठ महिन्यांपासून कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असून सदर कर्मचाऱ्याचे बिल शिक्षण संचालक महेश पालकर हे मंजूर करतील की नाही याची शंका निर्माण होत आहे. शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याशी रवींद्र शिंदे यांनी दूरध्वनीवर संपर्क केला असता शिक्षण संचालकांनी सांगितले की माझ्याकडे एकही बिल पेंडिंग नाही. नाशिक शिक्षण उपसंचालकांकडून गुरूवारी रात्री उशिराने बिल मंजूरीचे आदेश मिळाले आहेत. परंतु जिल्‍हा परिषदेतील वेतन कक्षातील बीडीएस प्रणातील प्राधिकार पत्र बंद असल्‍याने बिल ट्रेझरीला टाकता आलेले नाही. यामुळे बिल मिळण्यास अजूनतरी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्षोद मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

Latur Drought : लातूरमध्ये भीषण दुष्काळ! व्यथा सांगताना शेतकरी मुख्यमंत्र्यांना मिठी मारत ढसा ढसा रडला, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT