Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: घरात शिरताच बसला धक्‍का; पित्याला दिसला मुलीचा मृतदेह

घरात शिरताच बसला धक्‍का; पित्याला दिसला मुलीचा मृतदेह

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आई आणि भाऊ बाहेरगावी, तर वडील कामाला गेल्याने घरात कोणीच नसताना कोमल वसंत भावसार (वय ३०, रा. रौनक कॉलनी, अयोध्यानगर) या तरुणीने (Jalgaon) घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात (Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

कोमल भावसार ही बँकेत अकाऊंटन्ट म्हणून नोकरीला होती. तिची आई आणि भाऊ पुण्याला गेले असून, वडील वर्कशॉपमध्ये कामाला गेले असताना ती घरी एकटीच होती. दुपारच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी वडील कामावरुन घरी परतले असता, त्यांना आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलीचा मृतदेह बघताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार अल्ताफ पठाण तपास करीत आहेत.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, तरुणीच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

SCROLL FOR NEXT