Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : तळोदा- बऱ्हाणपूर प्रस्तावित महामार्गामुळे जमीन जाणार; संतप्त शेतकऱ्यांकडून चक्काजाम

Jalgaon News : तळोदा- बऱ्हाणपूर या प्रस्तावित महामार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसह बागायती धारक शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जाणार आहेत.

संजय महाजन

जळगाव : तळोदा बऱ्हाणपूर प्रस्तावित महामार्ग रद्द करावा. तसेच पूर्णाड व अंतूर्ली फाट्यावरील (Jalgaon) उड्डाणपूल रद्द करावा, यासाठी परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान संतप्त (Farmer) शेतकऱ्यांचे महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरील अंतुर्ली फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. (Live Marathi News)

तळोदा- बऱ्हाणपूर या प्रस्तावित महामार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसह बागायती धारक शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जाणार आहेत. या विरोधात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर रास्ता रोको आंदोलन करून प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेल्या आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महामार्गावर लागल्या रांगा 

दरम्यान महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमा शेतकऱ्यांनी रोखून धरले. सकाळी हे आंदोलन उभारत सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन झाल्याने बऱ्हाणपूर मुक्ताईनगर या महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT