Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News: धावत्‍या कंटेनरने घेतला अचानक पेट; संगणकासह ७० लाखाचे नुकसान

धावत्‍या कंटेनरने घेतला अचानक पेट; संगणकासह ७० लाखाचे नुकसान

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव - धुळे महामार्गावर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हैद्राबाद येथून सुरतला (Surat) संगणक घेऊन जाणाऱ्या कंटेनरने खडकी फाटा (ता.चाळीसगाव) येथे अचानक पेट घेतला. यात सुमारे ७० लाखाचे नुकसान झाले आहे. तर कंटेनर देखील जळुन खाक झाला आहे. या घटनेची माहिती मेहुनबारे पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा केला. (Tajya Batmya)

चाळीसगाव- धुळे महामार्गावरील खडकी फाट्यावर हैद्राबादहुन सुरतकडे संगणक घेऊन जाणाऱ्या कंटनेरने अचानक पेट घेतला. कंटेनरने पेट घेतल्याचे त्याच्या मागे चालणाऱ्या वाहन धारकांच्या लक्षात येताच सदरील बाब कंटनेर चालकाला सांगितली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर आगीने रौद्र रूप धारण केले.

आग विझविण्यासाठी प्रयत्‍न

चालकाने आग विझविण्यासाठी कंटेनर रस्‍त्याच्या कडेला पलटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही उपयोग झाला नाही. या घटनेची (Chalisgaon) माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड व उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचारी पाठवले व सर्व माहिती घेऊन पंचनामा केला. कंटेनरमध्ये असलेले संगणक व कंटेनरसह सत्तर लाखांचे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : पोस्टाच्या PPF योजनेत वर्षाला गुंतवा फक्त ५०,००० रुपये अन् मिळवा भरपूर परतावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर पुष्पवृष्टी करत आगळावेगळा निरोप

Blouse Sleeves Designs: ब्लाउज स्लीव्हजचे 'हे' फॅन्सी पॅटर्न नक्की ट्राय करा, साध्या साडीतही मिळेल ग्लॅमरस लूक

Terrorist Attack : लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला; १२ जवानांचा मृत्यू, पाकिस्तानात खळबळ

Nagpur Accident: स्कूल व्हॅन आणि बसच्या अपघातात विद्यार्थिनी आणि चालक ठार, नागपुरातील घटना|VIDEO

SCROLL FOR NEXT