accident 
महाराष्ट्र

मित्राच्‍या घरी लग्नाला जाताना काळाची झडप

मित्राच्‍या घरी लग्नाला जाताना काळाची झडप

Rajesh Sonwane

जळगाव : मित्राच्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी जाणाऱ्या मित्रावर काळाने झडप घातली. विदगावकडे जात असताना समोरुन येणाऱ्या महिंद्रा पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सागर मोरे याचा जागीच मृत्यु झाला; तर गोविंदा सोनवणे गंभीर जखमी झाला असून त्‍यास उपचारासाठी जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (jalgaon-news-road-accident-one-death-and-one-injured)

अट्रावल (ता. यावल) येथे असलेल्‍या लग्‍न सोहळ्यासाठी सागर मोरे व त्याचा मित्र गोविदा तुकाराम सोनवणे हे दुचाकीने निघाले होते. सागर व गोविंदा हे जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय रेशन गोदामात हमालीचे काम करतात. त्यांच्या सोबतच असलेले सहकारी युवराज बोरसे यांच्या मुलीचे आज (ता.२८) यावल तालुक्यातील अट्रावल येथे लग्न होते. या लग्नासाठी सागर व गोविंदा असे दोघेही (एमएच १९ बीपी ७४१३) दुचाकीने अट्रावलकडे जाण्यासाठी निघाले होते.

मोकळ्या रस्‍त्‍यावर सुसाट

ममुराबाद– विदगाव या रस्‍त्‍यावर वाहनांची फारशी रहदारी नसते. यामुळे वाहने अगदी सुसाट वेगाने धावत असतात. याच दरम्‍यान विदगावकडून सुसाट वेगाने येणारी माल वाहु वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सागर मोरे जागीच ठार झाला. तर गोविंदा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मालवाहू वाहनांवरील चालक पसार झाला होता.

कुटूंबीयांचा अक्रोश

सागर याच्या पश्चात आई सिंधु, वडील राधेशाम, पत्नी पूजा मुलगा राघव (वय ७) मुलगी उज्ज्वला (वय ४) असा परिवार आहे. सागरचे वडील महापालिकेत कार्यरत असून घरून कामावर जातो असे सांगून नेहमीप्रमाणे गोविंदासेाबत गावातून (ममुराबाद) येथून निघाला. मात्र अकराच्या सुमारास त्याच्या मृत्युची बातमी कुटूंबीयांना कळाल्यावर ग्रामस्थांसह नातेवाईकांनी जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. सागरचा मृतदेह पाहताच कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT