महाराष्ट्र

आर्थिक विवंचनेतही प्रामाणीकता शाबुत..रिक्षा चालकाने सापडलेली रोकड केली परत

आर्थिक विवंचनेतही प्रामाणीकता शाबुत..रिक्षा चालकाने सापडलेली रोकड केली परत

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कोरोनाच्या पार्श्चभुमीवर गेली अठरा महिने बेरोजगारी आणि आर्थिक विवंचनेत गेली. नुकताच व्यवसाय सुरु झाला. पै..पै गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करणाऱ्या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकतेने आयपीएस अधीकाऱ्यालाही प्रभावीत करुन सोडले. (jalgaon-news-rickshaw-driver-returned-the-cash-bank-worker)

बँक कर्मचाऱ्याची सापडलेली रोकड आणि फाईल त्याचा शोध घेत सुखरुप परत करणाऱ्या रिक्षा चालकास सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला. अंजिठा चौकातील स्टेट बँकेत कार्यरत दिव्यांग परमेश्वर दत्तु पाटील मंगळवारी (ता.३) कामावरुन रिक्षाने घरी परतले. त्याच्यासेाबत २० हजारांची रोकड आणि फाईल असलेली पिशवी रिक्षात राहुन गेली हेाती. त्याचा त्यांना विसरही पडला होता.

पैशांनी केले अस्‍वस्‍थ अन्‌

रिक्षाचालक विजय प्रकाश पाटील यांना त्या पैशांनी अस्वस्थ करुन सोडले. मुळ मालकाला शोधण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करुन अखेर त्यांच्यापर्यंत रक्कम आणि फाईल सुखरुप पोचवल्यावर परमेश्वर पाटील यांनाही धक्का बसला. घडल्या प्रकराची माहिती सहाय्यक पेालिस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाल्यावर त्यांनी रिक्षा चालक विजय पाटील यांना कार्यालयात बोलावुन त्यांचा सत्कार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT