drug 
महाराष्ट्र

हेरॉईनप्रकरणी मुख्य सूत्रधार गजाआड; मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात

हेरॉईनप्रकरणी मुख्य सूत्रधार गजाआड; मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : सुमारे एक कोटी रुपयांच्या जप्त केलेल्या हेरॉईनप्रकरणी संशयित आरोपी अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ हिला शुक्रवारपर्यंत (ता.२४) पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासही पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले असून, या तस्करी प्रकरणाची पाळेमुळे पाकिस्तानपर्यंत पोहचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (jalgaon-news-raver-heroin-case-main-facilitator-arrested-from-Madhya-Pradesh)

स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता. १८) लावण्यात आलेल्या सापळ्यात रावेर पोलिसांच्या मदतीने बऱ्हाणपूर येथील मोमिनपुरा भागातील अख्तरी बानो पिता अब्दुल रउफ या ४५ वर्षीय महिलेला सुमारे अर्धा किलो हेरॉइनसह अटक केली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा मध्यप्रदेशातील धारजवळील मंदसौर येथील सलीम खान शेर बहादूर खान असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने तिकडे रवाना झाले होते. रात्री उशिरा पोलिसांनी त्याला तेथे ताब्यात घेतले असून, आज (ता. १९) सायंकाळपर्यंत त्याला येथे आणण्यात येणार आहे.

बऱ्हाणपूर येथील घराची झडती

दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी अख्तरी बानो हिला रविवारी (ता. १९) भुसावळ येथील न्यायालयापुढे उभे केले असता तिला शुक्रवारपर्यंत (ता.२४) पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यामुळे पोलिसांना आता तिच्याकडून कसून तपास करता येणार असून, तिचे आणखी साथीदार कोण कोण याचीही माहिती मिळण्याची शक्यता आहे. तसेच बऱ्हाणपूर येथील तिच्या घराची झडती देखील घेण्यात येण्याची शक्यता आहे.

तस्करीचे केंद्र बऱ्हाणपूर

यापूर्वी अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे ठिकाण होते. मात्र, पोलिसांनी तेथील प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्याने आता महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवरील बऱ्हाणपूर येथून ही तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे वृत्त आहे. बऱ्हाणपूर येथून महाराष्ट्राच्या हद्दीत नकली नोटा, पिस्तूल, गुटखा, गोवंश (पशुधन) आणि आता हेरॉइन- ब्राऊन शुगरसारखे अमली पदार्थ देखील तस्करीच्या मार्गाने येत आहेत. रावेरला अटक झालेली ही महिला बऱ्हाणपूर येथील रहिवासी असल्याने या संशयाला बळ मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT