Pachora News Saam tv
महाराष्ट्र

आमदार किशोर पाटलांच्‍या समर्थनार्थ रॅली; घोषणांनी पाचोरा दणाणले

आमदार किशोर पाटलांच्‍या समर्थनार्थ रॅली; घोषणांनी पाचोरा दुमदुमले

संजय महाजन

पाचोरा (जळगाव) : पाचोरा येथील 'शिवतीर्थ' या शिवसेना कार्यालयापासून ढोल ताशांच्या गजरात आमदार किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ अभूतपूर्व रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढण्यात येऊन शिवसेना (Shiv Sena(Bhad) कार्यालयाच्या प्रांगणात रॅलीचे सभेत रूपांतर झाले. (jalgaon news Rally in support of MLA Kishor Patil Pachora sighed at the announcements)

भडगाव (Bhadgaon) विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ पाचोरा (Pachora) व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी काढलेल्या अभूतपूर्व रॅलीत समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी शहर दुमदुमले. आमदार किशोर पाटील सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यासाठी शिवालय या त्यांच्या संपर्क कार्यालयात पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होवुन त्यात पाचोरा मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासासाठी आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांचे नेतृत्व योग्य असल्याचा विश्वास व्यक्त करत रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला होता.

आमदार किशोर पाटील यांचे खंदे समर्थक व जिवलग मित्र मुकुंद बिल्दीकर, युवा नेते सुमित पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर यांचेसह पदाधिकाऱ्यांनी भव्य रॅलीचे नियोजन करून रॅली यशस्वी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

टिटवाळ्यात पाणीटंचाईचा कहर! पाणी आणायला गेलेल्या 3 चिमुकल्यांना भरधाव कारची धडक

SCROLL FOR NEXT