Raver Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Raver Lok Sabha : रक्षा खडसेंची रावेरमधून विजयाची हॅट्रिक

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली.

Rajesh Sonwane

जळगाव : लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघातून या पूर्वी दोन वेळेस निवडून आलेल्या भाजपच्या रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा ३ लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळवत विजय निश्चित केला आहे. 

रावेर (Raver) लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा सामना झाला. श्रीराम पाटील हे पहिल्यांदाच निवणुकीच्या रिंगणात उतरले होते. यंदाच्या निवडणुकीत रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या विरोधात त्यांच्या नणंद रोहिणी खडसे- खेवलकर या प्रचारात उतरलेल्या होत्या. मात्र एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येण्याच्या वाटेवर असल्याने त्यांनी देखील प्रचारादरम्यान मदत झाली. त्यामुळे काही ठिकाणी जिथे कमकुवत स्थिती होती, त्या ठिकाणी पक्ष मजबुतीने बांधला गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. 

रावेर लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय पहिले असता सर्वाधिक मतदान हे मलकापूर विधानसभा क्षेत्रात झाले आहे. (jalgaon) भुसावळ मतदार संघात सर्वांत कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र रावेर लोकसभा मतदार संघात लेवा पाटीदार समाज हा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा फायदा निश्चितच रक्षा खडसे यांना झाला असल्याने रक्षा खडसे यांना ६ लाख २१ हजार ९४७ तर श्रीराम पाटील यांना ३ लाख ६ हजार १६८ इतके मते मिळाली आहेत. अर्थात रक्षा खडसे यांना चांगले मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

SCROLL FOR NEXT