Jalgaon News Today, Latest Jalgaon News Updates, North Maharashtra News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: आधी लग्नाचे वचन, नंतर ब्लॅकमेलिंग; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

आधी लग्नाचे वचन, नंतर ब्लॅकमेलिंग; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : प्रेमाचे खोटे नाटक करून फसवणूक, ब्लॅकमेल करणाऱ्या मुलाने स्वतःही लग्न केले नाही, दुसऱ्याशीही होऊ देत नाही, मुलाची आई नको ते लांछन लावते. या वेदना असह्य झाल्याने अखेर पीडितेने (Suicide) गळफास घेतला. मृत्यूशी १८ दिवस झुंज देत दिव्याने बुधवारी (ता. १३) मृत्यूला कवटाळले. (Jalgaon News Today)

मृत तरुणीच्या मोठ्या वडिलांनी (काका) जिल्‍हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात (Jalgaon News) म्हटले आहे, की तारखेडा (ता. पाचोरा) येथील दिव्या दिलीप जाधव (वय २१) आई-वडिलांसह गावात वास्तव्याला होती. आई-वडील हातीमजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावातील नीलेश मंगलसिंग गायकवाड याने दिव्याशी मुद्दाम ओळख केली. नीलेशने लग्नाचे (Marriage) आमिष दाखवून दिव्याचा प्रेमासाठी होकार मिळविला.

अन्यत्र विवाहाचा निर्णय

यादरम्यान दिव्याच्या आई-वडिलांनी तिचा विवाह करण्याचा निर्णय घेतल्याने मी लग्न करणार आहे, असे,सांगत नीलेश नेहमीच आडकाठी आणत होता. मुलीच्या अवाडीला प्राधान्य देत सामान्य कुटुंबातील जाधव कुटुंबाने थेट नीलेश गायकवाड यांच्या घरी जाऊन लग्नाबाबत मागणी घातली. मात्र, मुलाच्या आईने स्पष्ट शब्दात नकार देत त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर पुन्हा त्यांनी दिव्यासाठी स्थळ शोधमोहीम राबवून एका ठिकाणी बोलणी पक्की केली होती. मात्र, तेही त्याने जमू दिले नाही.

पंचांची हकालपट्टी

दिव्या आणि नीलेशच्या प्रकरणात समाजातील ज्येष्ठ मंडळी आणि पंचांनी मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केला. नीलेशच्या आई-वडिलांना लग्नासाठी होकार देण्यास सांगितल्यावर त्याच्या आईने मात्र ‘माझा नवरा रेल्वेत नोकरीला, शेती, चार प्लॉट इतकी संपत्ती आहे. त्या मुलीचा बाप भिकारी. काय आहे त्याच्याकडे. माझा मुलगा चार लफडे करेल. तुमच्या मुलीला आवरा’, असे म्हणत पिटाळून लावले.

ब्लॅकमेलिंग अन्‌ आत्महत्या

दिव्याचे लग्न दुसरीकडे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कळताच नीलेशने त्याचे दिव्यासोबतचे फोटो, कॉल रेकॉडिंग आणि चॅटिंग त्या मुलाच्या कुटुंबीयांना पाठविण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केले होते. वारंवार समजूत काढून विनवण्या करूनही तो थांबत नव्हता. उलटसुलट व्हॅाट्‌सॲप चॅटिंगसह त्याचा त्रास, शिवीगाळ, दमदाटी वाढल्याने दिव्याने त्रास असह्य झाल्याने २४ जूनला दुपारी आई-वडील शेतात असताना गळफास घेतला. नातेवाइकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने तिला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. सलग १८ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेरीस बुधवारी (ता. १३) दिव्याची प्राणज्योत मालवली. (Latest Jalgaon News Updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढली; काँग्रेस- ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंना साथ

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

SCROLL FOR NEXT