Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: गुंतवणुकीच्या आमीषाला सहाय्यक फौजदारच बळी; ३ लाखांचा चुना

Jalgaon News : गुंतवणुकीच्या आमीषाला सहाय्यक फौजदारच बळी; ३ लाखांचा चुना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गोल्ड क्वाइन घेण्याचे आमिष दाखवत निवृत्त सहाय्यक फौजदाराला ३ लाख १ हजार रुपयांत (Jalgaon) गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस (Police) ठाण्यात दोन संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

पोलिस दलात सहाय्यक फौजदार पदावरुन निवृत्त झालेले पुरुषोत्तम सुपडू लोहार (वय ६३) हे मयुर कॉलनी, पिंप्राळा येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे निवृत्ती वेतनाची रक्कम जमा झालेली होती. त्यावेळी मुंबई येथील भैया पाटील व कामता सोनी या दोघांनी लोहार यांच्याशी ओळख निर्माण केली. भैया पाटील यांनी शहरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये बोलवून त्यांना गुंतवणुकीचे (Crime) अमिष दाखविले. 

सोन्याचे कॉईन दिले 

त्यानंतर त्यांना कंपनीकडून सोन्याचे क्वाइन घेऊन कंपनीत गुंतवणूक (Fraud) करण्यास सांगून एक आयडी दिला. त्यामध्ये दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर दोघांनी त्यांच्याकडून (Jalgaon Police) वेळोवेळी ३ लाख १ हजार रुपये घेतले. गुंतवणुकीच्या नावार पैसा घेवुनही कुठलाच परतावा मिळत नसल्याने, तसेच पैसे मागूनदेखील परत मिळाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लोहार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिंदेंनीच ठाकरेंना पक्षातून काढलं; सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Weight Loss: ट्रेडमिल की बाहेर चालणे? वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

SCROLL FOR NEXT