Gold Silver Saam tv
महाराष्ट्र

Gold- Silver: पितृपक्ष संपताच सुवर्ण खरेदीला झळाळी; दसऱ्याला अधिक उलाढालीची शक्‍यता

पितृपक्ष संपताच सुवर्ण खरेदीला झळाळी; दसऱ्याला अधिक उलाढालीची शक्‍यता

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पितृ पंधरवाड्यात शक्‍यतो सोने– चांदी खरेदी केली जात नाही. परंतु, पितृपक्ष संपताच (Jalgaon) सुवर्ण खरेदीला झळाळी येत असते. हे चित्र घटस्‍थापनेच्‍या दिवशीच पहावयास मिळाले. यात (Gold) सोने– चांदीचे दर कमी झाल्‍याने खरेदीची चांगली संधी देखील नागरीकांना मिळाली आहे. (Jalgaon News Gold Silver News)

पितृपक्ष संपताच सराफ बाजारातील मंदी संपते. यानंतर सुवर्ण पेढ्यांमध्‍ये देखील खरेदीच्‍या उलाढालीला सुरवात हेात असते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेक ग्राहकांनी सोने चांदी (Silver) खरेदीचा मुहूर्त साधला. आदिशक्तीच्या आगमनाने बाजारपेठेत चैतन्य पसरले असल्याचे सुखद चित्र आहे.

दरही झाले कमी

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव २०० रुपयांनी कमी होऊन ५० हजार ३०० रुपये प्रतितोळा तर चांदीचा भाव ८०० रुपयांनी कमी होऊन ५६ हजार रुपये प्रतिकिलोवर आला आहे. सुवर्ण व्यवसायातील पितृपक्षाचा मंदीचा काळ सपला असून नवरात्रोत्सवापासून खरेदीला वेग येऊ लागला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत सोने- चांदीचे भाव कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.

आकर्षक आभुषणे उपलब्‍ध

नवरात्र व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण व्यावसायिकांनी देखील सोने, चांदीची आकर्षक आभूषणे उपलब्ध केली आहेत. दसऱ्याच्‍या मुहूर्तावर अधिक उलाढाल मानली जात असून यानंतर धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा हे मुहूर्त देखील साधले जातील. त्‍यादृष्‍टीने सुवर्ण अलंकारांसह चांदीचे पूजा साहित्य, लहान मूर्ती, मुकूट, छत्र सिंहासन यांना मागणी राहणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain Live News : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Gauri Kulkarni: पैठणी साडीत गौरी कुलकर्णीचं सुंदर फोटोशूट; PHOTO पाहा

Early signs of cancer: महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नये; कॅन्सरचे प्राथमिक संकेत असू शकतात

GK: 'या' देशात तुरुंगातून पळणे गुन्हा मानले जात नाही, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT