विष 
महाराष्ट्र

धक्‍कादायक..आईसमोरच मुलीला पाजले विष; पैशांच्या वादातून घटना

धक्‍कादायक..आईसमोरच मुलीला पाजले विष; पैशांच्या वादातून घटना

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : पैशाच्या वादातून २८ वर्षीय विवाहितेला मारहाण करत जबरदस्तीने आईसमोर विष पाजून तिचा खून केल्याची घटना बुधवारी (ता. १३) सकाळी नऊला धरणगाव रस्त्याजवळील एका शेतात घडली. (jalgaon-news-parola-poisoned-girl-in-front-of-mother-Incidents-from-money-disputes)

पारोळा शहरातील राजीव गांधीनगर परिसरातील रहिवासी उषाबाई प्रकाश खाडे बुधवारी सकाळी नऊला आपली विवाहित मुलगी पूजा संदीप शिंदे हिच्यासोबत शेतात काम करीत होत्या. अचानक झोडगे येथील संशयित पंकज हिलाल चौधरी हा दुचाकीने शेतात आला. त्याने माझे पंधरा हजार रुपये द्यावे, अशी मागणी करत पूजाला मारहाण केली. पती त्रास देत असल्याने ती दोन वर्षांपासून माहेरी आली असून, मी कोणतेही पैसे घेतले नाही, पती किंवा सासरे यांनी पैसे घेतले असतील, असे पूजाने त्याला सांगितले. मात्र, संशयित चौधरीने काहीही ऐकून न घेता पूजाचा गळा दाबला, तसेच जवळचे पडलेले विषारी औषध तिला पाजले. पूजाच्या आईसमोरच ही घटना घडली. पूजाची आई उषाबाई खाडे यांनी विरोध केला. त्यांच्यात झटापटी झाली. मात्र, त्यांना ढकलून दिले.

संशयिताने आणले रुग्णालयात

दरम्यान, घटनेनंतर संशयित पंकज चौधरी घाबरला. त्याने पूजाला दुचाकीवर बसवून पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. त्यानंतर संशयित पसार झाला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

Zodiac signs wealth: शुक्ल त्रयोदशीचा योग जुळला; आजचा दिवस ४ राशींसाठी ठरणार गेम चेंजर!

Municipal Corporation Election Date : महापालिका निवडणुकीची संभाव्य तारीख समोर, वाचा कधी उडणार धुरळा

Home Rent Rules: केंद्राचा मोठा निर्णय! घरभाडे कराराच्या नियमांत केला मोठा बदल; मालक आणि भाडेकरुंना होणार फायदा

Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT