Bhusawal Surat Passenger Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal Surat Passenger : एक महिन्याच्या बाळाला घेऊन दाम्पत्य रेल्वेत चढले; बोगीत झोळी करून झोपविले, पुढच्या स्टेशनवर उतरून आई- वडिल पसार

Jalgaon News : लग्न कार्यासाठी भुसावळ- सुरत पॅसेंजरला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत निर्दयी आई- वडिलांनी आपल्या अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून पलायन केले आहे

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : रेल्वेमध्ये सध्या प्रवाशांची मोठी गर्दी आहे. यातच भुसावळ- सुरत पॅसेंजरमध्ये प्रवाशांच्या गर्दीत एक दाम्पत्य एक महिन्याच्या बाळाला घेऊन प्रवासासाठी चढले. मात्र या एक महिन्याच्या बाळाला रेल्वे बोगीतच सोडून आई- वडील पुढच्या स्टेशनवर उतरून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नंदुरबार रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भुसावळ- सुरत पॅसेंजरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नसराई असल्यामुळे रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी आहे. यातच सुरत- उधना येथे खानदेशातील नागरिक कामानिमित्ताने मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. मात्र लग्न कार्यासाठी भुसावळ- सुरत पॅसेंजरला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत निर्दयी आई- वडिलांनी आपल्या अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून पलायन केले आहे. 

झोक्यात बाळाला झोपविले 

भुसावळ- सुरत पॅसेंजरच्या सर्वसाधारण बोगीत एक जोडपे अवघ्या एक महिन्याच्या बाळाला घेऊन धरणगाव रेल्वे स्थानकावरून चढले. गर्दी असताना देखल त्यांनी रेल्वे डब्यातच बाळासाठी झोका बांधला. यात बाळाला टाकून झोपविले. मात्र, अमळनेर स्थानक येताच पती- पत्नी तेथे उतरून गेले. दरम्यान पुढील स्टेशन दोंडाईचा आल्यानंतर डब्यातील प्रवाशांच्या सदरची बाब लक्षात आली. यानंतर रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 

स्थानकावर सीसीटीव्ही नसल्याने शोध घेण्यात अडचण 

दरम्यान रेल्वे पोलिस अनिता चौधरी व अलका अढाळे यांनी बाळाला नंदूरबार रेल्वे स्थानकावर उतरवून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच नंदुरबार रेल्वे पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धरणगाव व अमळनेर स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या बाळाला घेऊन रेल्वेत कोण चढले व कोण उतरले? याची माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे पलायन करणाऱ्या आई- वडीलांना शोधण्याचे आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT