Jalgaon News Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी आलेल्या तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

गणेशोत्सवासाठी आलेल्या तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : येथील पोलिस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या व नांदेड येथे अभियांत्रिकीचे शिक्षण (Education) घेणाऱ्या १९ वर्षीय पोलिसपुत्राचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ७) सायंकाळी घडली. (Jalgaon News Electric Shock)

पाचोरा (Pachora) येथील पोलिस उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी अशोक महाजन यांचा एकुलता एक मुलगा आदित्य हा नांदेड येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. गणेशोत्सव (Ganesh Festival) असल्‍याने तो पाचोरा येथे आला होता. दरम्यान, बुधवारी (ता. ७) सायंकाळी पाणी भरण्यासाठी विजेचा पंप सुरू करण्यासाठी गेला असता त्यास (Electric Shock) विजेचा धक्का लागून तो जागीच मृत झाला. यामुळे पोलिस वसाहतीत शोककळा पसरली. मृत आदित्यवर गुरुवारी (ता. ८) सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी पोलिस वसाहतीतील असुविधा व समस्यांबाबत यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT