Kishor Patil Vaishali Suryavanshi Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: शिवसेना काय हे त्‍यांना माहीत नाही; आमदार किशोर पाटील यांचे प्रतिउत्‍तर

शिवसेना काय हे त्‍यांना माहीत नाही; आमदार किशोर पाटील यांचे प्रतिउत्‍तर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आत्ताच राजकारणात आलेल्‍या असून शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला आहे. यामुळे त्यांना शिवसेना काय हे माहित नाही; असं उत्तर आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी त्यांची बहीण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांना दिले आहे. (Jalgaon Shiv Sena News)

निष्ठावान शिवसैनिकांना (Shiv Sena) गाड्या घोड्यांची गरज नाही उत्स्फूर्तपणे दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) रवाना झाले आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे बंधू शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना लगावला होता. यावर जोरदार प्रतिउत्तर देताना आमदार किशोर पाटील बोलत होते.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पाचोर्‍यात आमदार किशोर पाटील तर दुसरीकडे त्यांच्या बहिण उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी या आमने- सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. कितीही गाड्या केल्या तरीही सायंकाळी गर्दी ही उद्धव ठाकरे यांच्याच मेळाव्याला होईल; असा हल्‍लाबोल वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे भाऊ शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांच्‍यावर केला होता. यावर आमदार किशोर पाटील यांनी उत्तर देत गर्दी एकनाथ शिंदे यांच्याच मेळाव्याला होईल.

बाळासाहेबांच्‍या विचारांचे सोनं लुटायला कार्यकर्ते गेले

पाचोरा व भडगाव तालुक्यातील दहा हजार कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी मुंबईला रवाना झाले असून हे शक्तिप्रदर्शन नव्हे तर बाळासाहेबांच्या विचारांचे सोनं लुटण्यासाठी उस्फूर्तपणे हे कार्यकर्ते मेळाव्यासाठी जात असल्याचे स्पष्टीकरण आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केले. दुसरा मेळावा कोणता होईल हे माहित नाही. मात्र आमचा मेळावा हा बाळासाहेबांच्या विचाराचा हिंदुत्वाच्या विचारांचा होईल असे सुद्धा ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांच्या सोबत; सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली - उद्धव ठाकरे

Devisha Shetty: 'हिंसाचार म्हणजे लोकशाही नाही', सूर्यकुमार यादवच्या पत्नीची पोस्ट चर्चेत; CJP आंदोलनावर स्पष्ट केली भूमिका

Kanda Bhaji Recipe : १ थेंबही तेल न वापरता बनवा कुरकुरीत कांदा भजी, वापरा 'ही' सिक्रेट ट्रिक

Gold Price Today : सोनं खरेदी करायचंय? थांब आधी आजचे दर पाहा! सलग तिसऱ्या दिवशी किमतीत मोठा बदल

कमी वेळात झटपट बनवा नाश्त्याच्या 5 सोप्या रेसिपी, ऑफिससाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT