crime news saam tv
महाराष्ट्र

Crime: दुचाकीचा कट लागल्‍याचे कारण; मारहाणीत तरूणाचा खून

दुचाकीचा कट लागल्‍याचे कारण; मारहाणीत तरूणाचा खून

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पाचोरा शहरात सोमवारची पहाट थरकाप उडविणारी झाली. केवळ दुचाकीचा कट लागल्याचे क्षुल्लक कारणाने रागातून दोन तरुणांना लाठ्या– काठ्यांनी जबर मारहाण झाली. यात एका तरुणाचा चॉपरने भोसकून खून (Jalgaon Crime) करण्यात आल्‍याची घटना घडली आहे. (jalgaon news pachora The reason for the cut of the bike young man in a beating)

पाचोरा (Pachora) शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळेसमोरील मोकळ्या जागेत सदर घटना घडली. रविवारी (३० जानेवारी) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास सदर घटना घडली. याबाबत सनी रवींद्र देवकर (वय २३, रा. गाडगेबाबानगर, पाचोरा) यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील पुनगाव रोडवरील पुराणी शाळेच्या समोरील मोकळ्या जागेत दुचाकी वाहनाचा कट लागला म्हणून संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयुर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहुल पाटील, चेतन उर्फ स्टोयलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील, पवन पाटील (सर्व रा.पाचोरा) यांनी फिर्यादी सनी देवकर यास काठी, लाकडी दांडक्याने, फायटरने मारहाण (Crime) केली.

संशयितांना पहाटे अटक

सनीचा मित्र भूषण नाना शेवरे (वय २३) यालाही जबर मारहाण करीत चॉपरने पोटात भोसकले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. जखमींना रुग्णालयात दाखल केले असता तिथे भूषण नाना शेवरे याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. पाचोरा पोलिसांना (Police) माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच जखमींची फिर्याद मिळाल्यावर आज (३१ जानेवारी) पहाटे चार वाजेच्या सुमारास लोकेश शिंदे, मयुर पाटील, राकेश चौधरी, सागर पाटील, अविनाश पाटील यांना अटक केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात खुनाच्या गुन्ह्यासह गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT