Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: गृहकर्जासाठी अर्ज; ७६ हजारात महिलेची फसवणूक

गृहकर्जासाठी अर्ज; ७६ हजारात महिलेची फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : येथील विवाहितेला गृहकर्ज मंजूर करून देण्याचे आमीष दाखवून सदर विवाहितेची ७५ हजार ९०० रुपयात ऑनलाईन फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे. (Letest Marathi News)

पाचोरा (Pachora) येथील महिलेने गृहकर्जासाठी कुणाल सुनील चौधरी यांच्या सांगण्यावरून अर्ज केला. १५ ते २८ मे २०२२ दरम्यान गृहकर्जाची फाईल मंजूरीसाठी कुणाल चौधरी यांनी वेळोवेळी सदर विवाहितेकडून ऑनलाईन ७५ हजार ९०० रुपये (Crime News) घेतले. त्यानंतर गृहकर्जा संदर्भात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाही.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

कर्जही नाही व फाईल अथवा पैसेही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी कुणाल चौधरी यांचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कैलास पाटील करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत मिळणार? CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

Diabetic Retinopathy: तरुणांसाठी पुढील ३ ते ५ वर्षे धोक्याची; डायबेटीज वाढणार , नेत्रतज्ज्ञांचा गंभीर इशारा

Health Tips: माशासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update: असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

SCROLL FOR NEXT