Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: भरपावसात कुटुंबाला अतिक्रमित जागा खाली करण्याची नोटीस

भरपावसात कुटुंबाला अतिक्रमित जागा खाली करण्याची नोटीस

साम टिव्ही ब्युरो

सावदा (जळगाव) : येथून जवळच असलेल्या वाघोदा खुर्द गावात एका दिव्यांग सदस्य असलेल्या कुटुंबाला भर पावसात अतिक्रमित जागा आठ दिवसांत खाली करण्याची नोटीस येथील ग्रामपंचायती (Gram Panchayat) दिली. यानंतर हे गरीब कुटुंब कोठे व्यथा मांडणार? यावेळी गावातील राजू पटेल नामक एका युवकाने एक व्हिडियो बनवून तो (Social Media) सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यात त्याने या कुटुंबाची व्यथा मांडली. (Jalgaon News Today)

गावातील इतर मोठी अतिक्रमणे काढत नाही, पण या गरीब (Jalgaon News) कुटुंबास मात्र घर खाली करण्याची नोटीस देत घर खाली न केल्यास पोलिस बंदोबस्तात ते खाली करून जागा मोकळी करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस दिल्याने या युवकाने संतप्त भावना व्यक्त करीत आधी गावातील इतर अतिक्रमण काढण्याची हिंमत दाखवा असा सवाल केला आहे. नाहक गावाबाहेर राहणाऱ्या गरीब अपंग कुटुंबास त्रास देऊ नका, अशी विनंती करीत सर्व पक्षाचे नेत्यांनी देखील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन देखील केले आहे.

रेशनच्‍या गैरव्‍यवहाराचा व्‍हीडीओ केला होता व्‍हायरल

याच राजू पटेल नामक युवकाने ३ वर्षापूर्वी याच गावात रेशनमधील होणार गैरव्यवहार सोशल मीडियावर व्हायरल करून संपूर्ण राज्यात पोहचविला होता. त्यावेळी देखील नागरिकांना या माध्यमातून न्याय मिळाला आता देखील असाच न्याय या कुटुंबास मिळावा, अशी अपेक्षा देखील त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

अर्ज आल्याने नोटीस : ग्रामसेवक

याबाबत ग्रामसेवक श्रीकांत पाटील यांना विचारले असता काही लोकांनी या अतिक्रमणाबाबत अर्ज केल्यानेच नियमानुसार ग्रामपंचायतीला ठोसरे यांना नोटीस द्यावी लागली आहे. पण पावसाळा आहे, त्यामुळे तूर्तास निवासाचे अतिक्रमण काढू नये, असा लेखी अर्ज जर या कुटुंबाने दिला तर विचार होऊन कारवाई काही दिवसांसाठी टळू शकते, असे ग्रामसेवक पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

SCROLL FOR NEXT