महाराष्ट्र

ट्रकचा टायर फुटला अन काळजाचा ठोकाच चुकला..महामार्गावर लांब रांगा

ट्रकचा टायर फुटला अन काळजाचा ठोकाच चुकला..महामार्गावर लांब रांगा

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : महामार्गावर दुपारी बर्निंग कारचा थरार घडल्यानंतर रात्रीच्या सुमारास ट्रकला भीषण आग लागली. यामुळे महामार्गावर थरार निर्माण झाला होता. ही घटना महामार्गावरील शिवकॉलनी स्टॉपजवळ घडली. (jalgaon-news-natinal-highway-running-truck-tire-blast-and-truck-fire)

धुळे येथून बारदान घेवून जळगावात आलेल्या द्रकला टायर फुटल्याने भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावर घडली. महापालिकेच्या दोन अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

ठिणगी उडाली अन क्षणात भड़का

बाजार समितीत लागणारे बारदान घेवून जळगाव शहरात रात्री दहाच्या सुमारास ट्रक दाखल झाला. शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाण पुलावरून जात असताना चालत्या ट्रकचे टायर अचानक फुटले. यात ठिणगी उडाल्याने ट्रकमधील बारदानाला आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करीत ट्रकमधील बारदान खाक झाले.

नागरिकांचे प्रयत्न अपूर्ण

ट्रकला आग लागल्याचे समजताच ट्रक चालकाने रस्त्यावरच ट्रक थांबविला. यावेळी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांनी देखील आपापली वाहने थांबवून आग आटोक्यात आणण्यासाठी ट्रक मधील बारदात काढण्याचा प्रयत्न केला. परंतू काही वेळातच ट्रकने देखील पेट घेतला. महापलिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली. दुसरीकड़े राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूने जाणारे वाहन काही अंतरावर थांबविले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

Fact Check: तुमच्या कॉफीमध्ये झुरळाची पावडर, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT