accident 
महाराष्ट्र

तेलाचे तळे साचले अन्‌ नागरीकांनी भरल्‍या कॅन

तेलाचे तळे साचले अन्‌ नागरीकांनी भरल्‍या कॅन

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : खाद्यतेलाच्‍या दर वाढत असताना जमिनीवर तेलाचे डबके साचले व तेथून तेलाच्‍या मोठ्या कॅन भरून नेता येतील. अशी कल्‍पना देखील होवू शकत नाही. परंतु, हे प्रत्‍यक्षात झाले आहे. मुक्‍ताईनगर तालुक्‍यातील घोडसगावजवळ तेलाचा ट्रॅंकर पलटी होवून असे चित्र पाहायला मिळाले. (jalgaon-news-muktainagar-highway-oil-tanker-accident)

पावसात महामार्गावरून जात असलेल्‍या ट्रॅंकर चालकाने ब्रेक लावला. ब्रेक लावल्‍यानंतर चालकाने नियंत्रण सुटले व ट्रॅंकर पलटी झाला. यामुळे तेलाने भरलेल्‍या ट्रॅकरमधून तेल वाहिले व शेताच्‍या बांधावर पाऊस पडल्‍यानंतर जमिनीवर साचलेल्‍या पाण्याच्‍या डबक्‍याप्रमाणे तेलाचे डबके साचले होते.

पहाटे झाला अपघात

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ आज पहाटे चारच्या सुमारास मध्यप्रदेशातील इंदोर येथून ट्रॅंकर (क्र. एमपी ०९ एचएच २२७१) याने आजाद पटेल हा पामतेलचे ट्रॅंकर घेवून जात असतांना पलटी झाले. या घटनेत ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असल्याने त्याला इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अन्‌ नागरीकांनी भरल्‍या कॅनीच्‍या कॅनी

राष्ट्रीय महामार्गावरून पामतेल वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या घटनेत तेल वाहून नेणाऱ्या ट्रकमधील तेलाचे ट्रकच्या बाजूलाच शेत शिवारात मोठे तळे साचले होते. ही बाब नागरीकांच्‍या लक्षात आल्यावर परिसरातील नागरिक आणि हॉटेल चालकांनी मिळेल त्या साधनांच्‍या सहाय्याने तेल भरून नेले. अगदी पाच लिटर ते पंधरा लिटरच्‍या कॅनी भरून तेल नेत असल्‍याचे चित्र येथे पाहण्यास मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

Constipation : सकाळी पोट साफ होत नाही? ३ पदार्थ कोमट पाण्यात मिसळून प्या, रोजचा त्रास होईल बंद

शेळीपालनाचा व्यवसाय करायचाय, पण शेड नाहीये? शासनाकडून किती मिळतं अनुदान?

Work Life Balance : नोकरी अन् घर सांभाळताना दमछाक होतेय? वर्किंग मदर्सनी वापरा 'ही' सोपी ट्रिक; ताण होईल गायब

SCROLL FOR NEXT