Blood Donation Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: बाळंतीणीला पडली रक्‍ताची गरज; रात्री दोन वाजता रक्‍तदान करून वाचविले माता अन्‌ बाळाचे प्राण

बाळंतीनला पडली रक्‍ताची गरज; रात्री दोन वाजता रक्‍तदान करून वाचविले माता अन्‌ बाळाचे प्राण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पाचोरा शहरातील एका खासगी रूग्‍णालयात महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. परंतु, या महिलेला रक्ताची (Jalgaon News) आवश्यकता भासली. ओ निगेटीव्‍ह रक्‍तगट असल्‍याने रात्री दीडच्‍या सुमारास रक्‍त कुठून आणायचे असा प्रश्‍नच उभा राहिला. मात्र रात्री दोन वाजता एका सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला रक्तदान करत तिचे प्राण वाचविले आहे. इतकेच नाही तर वेळेवर रक्त (Blood) मिळाल्याने या महिलेने बाळालाही जन्म दिला. (Live Marathi News)

पिचर्डे (ता. भडगाव) येथील छाया गायकवाड असे जीवनदान मिळालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुनील माळी असे रक्‍तदान केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. हॉस्पिटलमध्ये (hospital) बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेला रात्री दोन वाजता रक्तदान करुन वाचविले प्राण या रक्तदात्यांचे कौतुक होत आहे. अर्थात रक्तदान (Blood Donation) हे श्रेष्ठदान असल्‍याचीच प्रचिती पाचोरा येथे मध्‍यरात्रीनंतर आली.

दिवसभर कधीही रक्त मिळणे हे सहज शक्य आहे. मात्र दुर्मिळ रक्तगट ओ निगेटिव्ह आणि तेही रात्रीच्या सुमारास मिळेल; याची कधीच श्वासती नसते. अशात बाळंतपणासाठी दाखल महिलेला या रक्‍ताची गरज भासली. या महिला रुग्णासोबत कुणीही नाही; अशात तिला रक्ताची गरज पडली. त्‍यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी रात्री दिड वाजेच्या सुमारास संपर्क केला. यानंतर सोमवंशी हे तातडीने हॉस्पिटलमध्ये उपस्थित होवून त्यांनी त्यांच्या संपर्कातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी यांना रक्‍तदानासाठी आग्रह केला. यानंतर माळी यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांच्या रक्ताने छाया गायकवाड यांचे प्राण डॉ. वैभव सुर्यवंशी वाचवु शकले आणि एका बाळाला तिने जन्म दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

SCROLL FOR NEXT