Jalgaon Crime News Updates Saam tv
महाराष्ट्र

अल्‍पवयीन मुलींचा विनयभंग; बसला पब्‍लीक मार

अल्‍पवयीन मुलींचा विनयभंग; बसला पब्‍लीक मार

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : शाळेतून घरी जात असणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीला बळजबरीने रिक्षात बसायला सांगत, तिच्‍या अश्‍लील बोलून धुळ्याच्या एका इसमाने तिचा व मैत्रिणीचा विनयभंग केल्याची घटना (Crime) घडली. यानंतर सदर इसमास पब्‍लीक मार पडला. (jalgaon news Molestation of minor girls Just hit the public)

गांधलीपुरा भागातील चुना घाणीजवळ (Amalner) राहणारी १४ वर्षीय बालिका दोन मैत्रिणींसह मंगलादेवी चौकातील अल्फाईज उर्दू शाळेत गेली होती. दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास ती मैत्रिणींसोबत परत येत असताना पवन चौकाजवळ मागाहून रिक्षा (क्र. एमएच १८, एपी ५६२) हिच्यातून एक इसम आला. तू रिक्षात बस म्हणून हात धरून ओढू लागला. बालिकेने झटका देत तेथून पळ काढला. (Jalgaon Crime News Updates)

हात धरताच मुलींनी केली आरडाओरड

तिघी मैत्रिणी गांधलीपुरा भागात गरीब नवाज चौकात आल्या असता पुन्हा रिक्षामधून मागाहून आला आणि मोबाईल नंबर मागून छेडू (Jalgaon) लागला. बालिकेने नाही म्हणताच त्याने तिच्या मैत्रिणीचा हात धरून तिला सांगू लागला की ही येत नाही तर तू चल आपण मजा करू. मुलींनी आरडाओरड करू लागताच गर्दी गोळा झाली. तेव्हा तो इसम धुळे (Dhule) येथील असलम खान पठाण (रा. गुलाम हाजीनगर विटा भट्टी देवपूर, धुळे) हा असल्याचे समजले. जमलेल्या नागरिकांनी चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेचव बालिकेच्या नातेवाईकांना बोलावले बालिकेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला विनय भंग व पोस्को कायद्याप्रमाणे असलम खान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT