Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil News : म्हणूनच सर्व आमदारांनी मिळून उद्धव ठाकरेंना मुख्यामंत्री केले; मंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon News: फुटलो नाही तर त्यांच्यासमोर गेलो. संजय राऊतांच्या समोर गेलो आणि सांगितल की जे गेले त्यांना परत बोलवा. तर त्यांनी आम्हाला हिणवलं

संजय महाजन

जळगाव : पक्षाचा नेता सांगेल त्यानुसार आम्ही आमदार काम करत असतो. त्यानुसार सर्व आमदारांनी मिळून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री केलं होतं. पण ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की आम्ही आमच्या विचारापासून लांब जातो आहे. तेव्हा आम्ही त्यांना सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण त्यांनी आम्हाला हिणवले; अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उबाठावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

जळगावात (Jalgaon) आयोजित महायुतीच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांची जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, लोक म्हणतात आम्ही फुटलो. पण फुटलो नाही तर त्यांच्यासमोर गेलो. संजय राऊतांच्या (Sanjay Raut) समोर गेलो आणि सांगितल की जे गेले त्यांना परत बोलवा. तर त्यांनी आम्हाला हिणवलं. तेंव्हा आम्ही २० आमदार गायब झालो. मला घ्यालला (Girish Mahajan) गिरीश महाजन आले. आमदार मंगेश चव्हाण तर सफाई कर्मचाऱ्यांचा ड्रेस घालून आले आणि मी अँब्युलन्समध्ये गेलो; असा खुलासा देखील पाटील यांनी केला. 



('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही लोकांचे अस म्हणणं असतं की सून ही परक्या घरची असते. तिला इकडे उमेदवारी देण्याची आवश्यकता नाही. स्मिता वाघ यांच्या विषयावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी शरद पवार यांना टोला दिला. स्मिता वाघ या आमच्या अमळनेर तालुक्यातील सून आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टीने मोठा विचार करून उमेदवारी दिली. जर स्मिता वाघ अमळनेर तालुक्याचा सून किंवा मुलगी नसत्या. भाजपने उमेदवारीचा विचारच केला नसता. भाजपमध्ये जुनी संस्कृती नसल्यामुळे आमच्या अमळनेर तालुक्यातल्या सून स्मिता वाघ यांचा विचार जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी केला त्याचा सार्थ अभिमान वाटतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT