Yashomati thakur 
महाराष्ट्र

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर शनिवारी जळगाव जिल्‍हा दौऱ्यावर

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर शनिवारी जळगाव जिल्‍हा दौऱ्यावर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर जळगाव जिल्‍हा दौऱ्यावर येत आहेत. मुंबईहून त्‍या उद्या (ता. ७) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून भुसावळला त्‍यांचे आगमन होवून त्‍यानंतर त्‍यांचा दौरा सुरू होईल. (jalgaon-news-minister-yashomati-thakur-tour-of-jalgaon-district)

मुंबईहून आज रात्री साडेअकराला त्‍या पाटलीपुत्र एक्‍सप्रेसने मार्गस्‍थ होती. यानंतर उद्या (ता. ७) सकाळी ६.२५ ला भुसावळ रेल्वेस्टेशन येथे आगमन होवून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रस्‍थान करतील. यानंतर सकाळी आठला शासकीय विश्रामगृह येथून अकलूज, पाडळसे, बामणोद येथे कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी, फैजपूर येथून महात्मा गांधी मार्गाने खिरोदाकडे प्रस्‍थान, खिरोदा येथे कर्मयोगी धनाजी नाना चौधरी स्मृती मंदिरात अभिवादन करतील. खिरोदा येथून रोझोदा, कोचूर, सावदा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून फैजपूरकडे प्रस्‍थान करतील. येथे सकाळी दहाला आगमन झाल्‍यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीव्दारे आयोजित ‘व्यर्थ न हो बलीदान’ कार्यक्रमास उपस्थिती व धनाजीनाना महाविद्यालय फैजपूर येथे रविंद्रनाथ टागोर यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दुपारी १२ ते १ दरम्‍यान फैजपूर येथे राखीव. यानंतर दुपारी १ वाजता फैजपूर येथून यावल, किनगाव, चोपडा, शिरपूरमार्गे शासकीय वाहनाने चिमठाणा (ता. दोंडाईचा, जि. धुळे) कडे रवाना होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT