जळगाव : ज्यांचे डोकं ठिकाणावर नाही, ज्यांचे डोकं फिरलय, तेच ५० खोके एकदम ओके असे वक्तव्य करत असल्याचे मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर आपल्या अनोख्या शैलीतून जोरदार टीका केली आहे. (Jalgaon News Ramdas Athawale)
भुसावळ (Bhusawal) येथील कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला; त्यावेळी ते बोलत होते. शिंदे गटातील आमदार हे गद्दार नाहीत. ते गद्दार असते तर त्यांच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता नसती. केवळ आमदार, खासदार शिंदे यांच्यासोबत नाही, तर संपूर्ण जनता ही त्यांच्या पाठीशी असल्याचे शिंदे (Eknath Shinde) यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेल्या सभांवरुन लक्षात येत असल्याचे आठवले म्हणाले.
गद्दारी शिंदेनी नाही तर ठाकरेंनी केली
उध्दव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा तो निर्णय चुकला असे म्हणत दसरा मेळावा होत आहे. यात शिंदे व उध्दव ठाकरे असा सामना रंगणार आहे. उध्दव ठाकरेंच्या आरोपांवर चोख उत्तर एकनाथ शिंदे हे देतील. गद्दारी ही एकनाथ शिंदे नव्हे तर उध्दव ठाकरे यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला; असेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.