Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : दीड वर्षांपूर्वी झाला विवाह; माहेरी आलेल्या विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पित्याचा सासरच्यांवर गंभीर आरोप

Jalgaon News : मृत विवाहितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूला सासरच्यांना जबाबदार धरून जावयासह इतर मंडळींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून पोलीस तपास करत आहेत

Rajesh Sonwane

जळगाव : साधारण दीड वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर काही दिवस आनंदाचे गेले. मात्र यानंतर सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून माहेरी आलेल्या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे घडली आहे. दरम्यान विवाहितेच्या पित्याने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. 

चाळीसगाव तालुक्यातील करजयी येथील प्रज्ञा चेतन शेळके (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून प्रज्ञा हि शिरसोली येथे आपल्या माहेरी राहत होती. दरम्यान प्रज्ञाचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील करजयी येथील चेतन शेळके यांच्याशी १ एप्रिल २०२४ ला झाला होता. लग्नानंतर प्रज्ञा आणि पती चेतन हे दोघेही पुण्यात राहत होते. प्रज्ञा ही पाच महिन्यांची गर्भवती होती. मात्र सासरच्या जाचाला कंटाळून ती माहेरी शिरसोली येथे आली होती. 

आई- वडील शेतात गेले असताना घेतला गळफास 

दरम्यान गुरुवारी प्रज्ञा हिचे आई- वडिल हे शेतात काम करण्यास गेले होते. यावेळी ती घरात एकटी असताना दुपारच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवले. प्रज्ञाचे वडील भागवत धामणे हे शेतातून आल्यानंतर घर बंद दिसले. यावेळी त्यांनी आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे दरवाजा तोडून आत गेले असता प्रज्ञा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी तातडीने तिला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी मरत घोषित केले. 

सासरच्यांवर कारवाईची मागणी 

मुलीच्या मृत्यूने तिच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. तर मृत प्रज्ञाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सासरची मंडळी सतत त्रास देत होते. इतकेच नाही तर गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. या मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. यामुळे कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली असून पोलिसांकडून तपास सुरु केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Makarand Anaspure : 'गावकी आणि भावकी...; मराठा-ओबीसी आरक्षणावर मकरंद अनासपुरेंचे मोठं भाष्य

Horoscope Saturday: व्यवसायात होणार फायदा, शनिवारी पैसा येणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Thane Shocking : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; स्टोअर मॅनेजरचा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Heart Disease Symptoms: शरीरात एकाच वेळी ही ७ लक्षणे; हार्ट फेल होण्याचे असू शकतात संकेत, वेळीच व्हा सावध

Maharashtra Live News Update: कल्याण शहरामध्ये नवरात्रौत्सव काळात जड -अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी

SCROLL FOR NEXT