Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : म्हशींना तलावातून बाहेर काढताना अनर्थ घडला; तलावात बुडून एकाचा मृत्यू

Jalgaon News : पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. बाहेर निघता न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अचानकपणे घडलेल्या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जात असलेल्या इसमासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. तलावाच्या पाण्यात उतरलेल्या म्हशींना बाहेर काढण्यासाठी तलावात उतरलेल्या या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे घडली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून घटनेनंतर परिवाराने एकच आक्रोश केला. 

अमळनेर तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथील आनंद सोनू मालचे (वय ५६) असे बुडून मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. आनंद हे रोज गुरे चारण्यासाठी शेतशिवारात जात असत. त्यानुसार ते १ सप्टेंबरला देखील गावापासून जवळ असलेल्या एका तलाव परिसरात म्हशी घेऊन चारण्यासाठी गेले होते. यावेळी काही म्हशी या तलावाच्या पाण्यात उतरल्या होत्या. बराच वेळ होऊन देखील म्हशी बाहेर येत नव्हत्या. 

पाण्यात उतरले असता बुडाले 

गावातील शेतकऱ्यांच्या म्हशी तलावाकडे चारण्यासाठी घेऊन गेले असता पाण्यात गेलेल्या म्हशींना बाहेर काढण्यासाठी आनंद मालचे हे तलावाच्या पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. बाहेर निघता न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अचानकपणे घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. 

तलावाजवळ चपला व पिशवी आढळली 

दरम्यान तलावाच्या परिसरात गावातील एकजण गेला असता त्याला तलावाच्या काठावर चपला व पिशवी आढळून आली. मात्र, आनंद मालचे हे कुठेही दिसून आले नाही. तर म्हशी देखील तलावात होत्या. त्यामुळे सदर व्यक्तीने याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईक व गावात सांगितली. यानंतर पोहणाऱ्यांना बोलावून तलावात शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह तलावात आढळून आला. आनंद यांचा मृतदेह पाहून कुटुंबाने एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT