Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : डोळ्यादेखत मुलाचा जीव गेला; मोटार लावताना विजेचा झटका

Jalgaon News : जळगाव शहरातील वाघनगर परिसरात संदीप भालेराव हे पत्नी, दोन मुले व आई यांच्यासह वास्तव्यास होते. ते खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दोन दिवसांनंतर नळाला पाणी आल्याने मोटार लावून पाणी भरले जात असते. यामुळे वीज पंप नळाला (Jalgaon) जोडत असताना विजेचा झटका लागून संदीप हिरामण भालेराव (वय ३८) यांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना जळगाव शहरात घडली. या प्रकरणी तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

जळगाव शहरातील वाघनगर परिसरात संदीप भालेराव हे पत्नी, दोन मुले व आई यांच्यासह वास्तव्यास होते. ते खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान २७ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाघनगर परिसराला पाणीपुरवठा करण्यात आला. संदीप भालेराव यांची आई घरी एकटीच असल्याने तीला मदत म्हणून संदीप हे पाणी भरण्यासाठी विद्युत पंप नळाला जोडत होते. ओलसर जागेत (Electric Shock) मोटार नळाला लावली असतानाच वीज बटन सुरु असल्याने संदीप यांना विजेचा जबर धक्का बसून ते लागल्यामुळे फेकले गेले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आवाज आल्याने काय झाले म्हणून आई पहिले असता तिने आरडाओरड करताच शेजारी मदतीला धावून आले. शेजाऱ्यांनी लागलीच  संदीप यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणी करून मयत घोषित केले. डोळ्या देखत तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने आईसह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. संदीप भालेराव यांच्या पश्‍चात आई विमलबाई, पत्नी पूजा, दोन मुलं असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT