Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पाण्याची मोटार सुरु करताना विजेचा जोरदार झटका; वृद्धाचा मृत्यू

Jalgaon News : मोटारीचे बटन दाबत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. विजेचा झटका बसल्याने ते दूरवर फेकले गेले.

Rajesh Sonwane

जळगाव : दोन दिवसांनंतर शहरात पाणी पुरवठा होत असल्याने पाणी लवकर भरावे, यासाठी पाण्याचा मोटरचा वापर केला जात आहे. दरम्यान नळाला पाणी आल्याने मोटार लावत असताना विजेचा जोरदार झटका बसला. यात एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील जिल्हापेठ परिसरात घडली आहे. सदरची घटना २१ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. 

जळगाव (Jalgaon) शहरातील जिल्हा पेठ परिसरातील सुधीर गोवर्धन महाजन (वय ७०) असे घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान सुधीर महाजन हे रविवारी सायंकाळी टाकी भरण्यासाठी मोटार सुरु करत होते. यासाठी मोटारीचे बटन दाबत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. विजेचा झटका बसल्याने ते दूरवर फेकले गेले. सदर घटना घरातील मंडळींच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

कुटुंबीयांचा आक्रोश रुग्णालयात नातेवाईक तसेच कॉलनीतील नागरिकांनी गर्दी केली होती. सुधीर महाजन यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घरातील वडीलधारी व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT