Mahavitaran 
महाराष्ट्र

वीजचोरांना दणका..जळगाव जिल्ह्यात ११२ जणांवर कारवाई

वीजचोरांना दणका..जळगाव जिल्ह्यात ११२ जणांवर कारवाई

Rajesh Sonwane

जळगाव : महावितरणच्या भरारी पथकांनी जळगाव जिल्ह्यात वीज चोरांविरोधात मोहिम राबविली जात आहे. या राबवलेल्या विशेष मोहिमेत वीजचोरीची ११२ प्रकरणे उघडकीस आली. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. (jalgaon-news-mahavitaran-Action-against-112-persons-in-Jalgaon-district)

कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमीतकुमार, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे सहायक संचालक सुनील थापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

बारा भरारी पथक

महावितरणच्या कोकण, औरंगाबाद व नागपूर प्रादेशिक कार्यक्षेत्रातील १२ भरारी पथकांनी जळगाव व भुसावळ विभागात २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजमीटरची व वीज जोडणीची तपासणी केली.

८२ ग्राहकांकडून मीटरमध्‍ये फेरफार

महावितरणने राबविलेल्‍या मोहिमेत ८२ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून व आकडे टाकून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. तर ५ ग्राहकांनी भार बदलणे किंवा वीजवापराचे प्रयोजन बदलणे अशा प्रकारे अनधिकृत वीज वापर केल्याचे आढळले. २५ ग्राहकांनी इतर अनियमितता केल्याचे दिसून आले. या सर्व ग्राहकांवर विद्युत कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. त्यांना वीजचोरीचे ३४ लाख ८५ हजार रुपयांचे अनुमानित बिल देण्यात आले आहे. हे बिल न भरल्यास त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदविला जाणार आहे. या कारवाईमुळे वीजचोरांमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

Breast cancer: शरीरात ही 8 लक्षणं दिसली तर समजा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो

SCROLL FOR NEXT