महाराष्ट्र

प्रत्येकी घेतले १,५७५ प्रवास भाडे; राज्‍याची सीमा संपणार म्‍हणून उतरविले प्रवाशांना

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : पुणे येथून सुमारे २० प्रवाशांना मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा आणि धारणी येथील तिकीट देऊनही त्यांना रावेर येथेच उतरवून दिल्याचा प्रकार ट्रॅव्हल्स बस चालक व वाहकाने केला. काही प्रवाशांनी हे प्रकरण पोलीस ठाण्यात आणल्यावर वाहक चालकाने काही प्रवाशांना बऱ्हाणपूरला जाणाऱ्या अन्य वाहनात बसवून देण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रवाशांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासही सहन करावा लागला. (jalgaon-news-madya-oradesh-Passengers-disembarked-as-the-maharashtra-state-boundary-was-about-to-road)

पुणे येथून मंगळवारी रात्री एक ट्रॅव्हल्स बस निघाली. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस रावेर येथे पोहचली. या बसमध्ये बऱ्हाणपूर खंडवा आणि धारणी येथे जाणारे प्रवासीही बसवण्यात आले होते. त्यांच्याकडूक प्रत्येकी १ हजार ५७५ रुपये भाडे आकारण्यात आले होते. मात्र या बसचा मध्यप्रदेशचा परवाना संपल्याने प्रवाशांना रावेर येथे उतरविण्यात आले. याबाबत प्रवाशांनी वाहक चालकाकडे विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची आणि अर्वाच्य भाषा वापरल्याची माहिती प्रवाशांनी दिली. काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त करीत आपला रस्ता धरला तर काहींनी मात्र बस येथील पोलिस ठाण्यात आणली.

नाईलाजाने प्रवाशी मार्गस्‍थ

बस वाहक आणि चालक हे वेगवेगळी कारणे सांगून या प्रवाशांशी बोलणे टाळत होते. त्यांनी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर प्रवाशांचा संपर्क होत नव्हता. अखेर सकाळी साडेअकरानंतर हे सर्व प्रवासी खाजगी गाड्यांनी बऱ्हाणपूर आणि खंडवाकडे रवाना झाले. ऐन दिवाळीच्या काळात या प्रवाशांचे तीन-चार तास वाया गेले. तसेच पुन्हा तिकिटे काढून पुढचा प्रवास करावा लागला. हे सर्व २०-२२ प्रवासी मध्यप्रदेशातील असल्याने येथील पोलिस ठाण्यात तक्रार देऊन वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पुढचा रस्ता धरला.

परवाना नसताना प्रवाशी बसविले कसे?

ट्रॅव्हल्स चालकांकडे मध्यप्रदेशचा परवाना नसतांना तिथले प्रवासी कसे बसविले? नेहमीपेक्षा दुप्पट भाडे कसे आकारले? प्रवाशांशी अरेरावी करणाऱ्या वाहक चालकांवर आरटीओ कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान याबाबत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना विचारले असता त्यांनी हा विषय आरटीओ कार्यालयाशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे कोणतीही लेखी तक्रार आली नसल्याने बस चालक आणि वाहक यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TVS Apache चा नवीन Black Dark Edition भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Bachchu Kadu: निवडणूक मुद्द्यांवर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये: बच्चू कडू

Arjun Tendulkar- Nicholas Pooran: पूरनचे लागोपाठ २ षटकार अन् अर्जुन तेंडुकरने मैदानच सोडलं! नेमकं काय घडलं?

MI vs LSG Highlights: हंगामाची सुरुवात अन् शेवटही पराभवानेच! घरच्या मैदानावर मुंबईचा लखनऊकडून दारुण पराभव

Maharashtra Politics 2024 : 'दक्षिण भारतात भाजपच्या १० जागाही येणार नाहीत'; आदित्य ठाकरेंचा भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT