महाराष्ट्र

मध्‍यप्रदेशातील तरूणीला दिले लग्‍नाचे आमिष; घरी नेत केला अत्‍याचार

मध्‍यप्रदेशातील तरूणीला दिले लग्‍नाचे आमिष; घरी नेत केला अत्‍याचार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मध्यप्रदेशातील वीस वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत पाल (ता. रावेर) येथे अत्याचार केल्याची धक्कादायक घडना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाल येथील गुलाम रसुल नवाज तडवी (वय २५) याची ओळख नाशिक येथे मजूरीसाठी आले असता मध्यप्रदेशातील वीस वर्षीय तरूणीशी निर्माण झाली. त्यानंतर एकमेकांशी मोबाईलवर संपर्क झाला. तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला २ जूनला भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली असता गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी नेले.

लग्‍नाचे आमिष देत अत्‍याचार

घरी नेले असता तेथे त्‍याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा ९ सप्टेंबरला देखील पिडीत तरूणीवर अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत तरूणीने मध्यप्रदेशातील छीपाबड पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दिली. तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा हा रावेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. अद्याप संशयित आरोपीला अटक केलेली नाही. पुढील तपास डीवायएसी विवेक लावंड करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde : झाडं आमचे आई-बाप, त्यांच्यावर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंने संतापले

महिला शिक्षकाची वाट अडवली; दोघांनी मिळून कपाळावर गोळी झाडली, भरदिवसा रक्तरंजित थरार

Nitesh Rane: तपोवनातल्या वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? राणेंचा सवाल, शिरसट म्हणाले...

मुंबई-गोवा महामार्गाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? नव्या डेडलाइनची घोषणा

Paneer Roll: मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक पनीर रोल; सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT