Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीतुन अधिक नफ्याचे आमिष; तरुणाची ४३ लाखांत फसवणुक

Jalgaon News : जळगाव शहरातील निवृत्तीनगरामधील तरुणाला ३ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबरदरम्यान व्हॉट्‌सॲपवरून अनन्या वर्मा आणि पुनीत भाटिया यांनी संपर्क साधला

Rajesh Sonwane

जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल; असे सांगून जळगाव शहरातील एका तरुणाची ४३ लाख २२ हजार ६५३ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सायबर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरातील निवृत्तीनगरामधील तरुणाला ३ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबरदरम्यान व्हॉट्‌सॲपवरून अनन्या वर्मा आणि पुनीत भाटिया यांनी संपर्क साधला. त्यांनी आयपीओमध्ये पैसे गुंतविल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, (Cyber Crime) असे सांगून शेअर बाजाराचे ऑनलाइन आलेख दाखविणारे बनावट ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्या माध्यमातून तरुणाला ऑनलाइन पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर सुरुवातीला आभासी नफा दाखविला. 

मात्र मी वेळेत श्रीमंत होण्याचा मार्ग सांगत दोघांनी पुन्हा ऑनलाइन रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. असे सुमारे तब्बल ४३ लाख २२ हजार ६५३ रुपये ऑनलाइन स्वीकारले. गुंतवणूक केल्यानंतर कुठलाच परतावा मिळाला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने सायबर पोलिस ठाण्यात अनन्या वर्मा आणि पुनीत भाटिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT