Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: थरारक घटना..बिबट्याचा अचानक हल्‍ला; शेतकऱ्याचा ताकदीने सामना अन्‌ वाचविला जीव

थरारक घटना..बिबट्याचा अचानक हल्‍ला; शेतकऱ्याचा ताकदीने सामना अन्‌ वाचविला जीव

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : धोबी वराड गावात गुरुवारी (१८ मे) सकाळी दहाच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढविला. अचानक झालेल्‍या हल्‍ल्‍यात शेतकरी (farmer) भेदरतो. बिबट्या आपल्‍या जबड्यात मान पकडण्याच्या बेतात असतानाच (Leopard) बिबट्याला ४० वर्षीय शेतकरी ताकदीने झटकून फेकतो. यावेळी आरडाओरड झाल्‍याने ग्रामस्थ येतात अन्‌ बिबट्या पळ काढतो. (Maharashtra News)

कुटुंब व ग्रामस्थांच्‍या माहितीनुसार, धोबी वराड (ता. जळगाव) येथील ४० वर्षीय आशिष सुधाकर सुरळकर हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी जात होते. याचवेळी अचानक बिबट्याने त्‍यांच्‍यावर हल्ला केला. आशिष यांनी वेळीच प्रसंगावधान राखत प्रतिकार करून मान पकडण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला उचलून पटकले. या प्रयत्नात मात्र त्यांच्या चेहऱ्यावर बिबट्याने पंज्याचा वार केला. त्यात त्यांच्या डोळ्याला, कानाला जबर जखम झाली आहे. आजूबाजूचे शेतकरी व मजूर मदतीला धावून आल्याने बिबट्याला पळ काढावा लागला. जखमी आशिष यांना तत्काळ (Jalgaon) जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

शेतातील गाय फस्त

जखमी आशिष सुरळकर यांच्याकडून रुग्णालयात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी सांगितले, की रात्री अकरा ते बाराच्या सुमारास लहू जाधव यांची शेतामध्ये बांधलेली पांढरी गाय याच बिबट्याने फस्त केली असून, महिन्यापूर्वी वासरूही पळवून नेले होते. धोबी वराड गावात बिबट्याची प्रचंड दहशत असून, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वळसंगमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, 5 आरोपी अटकेत

मोरपंखाची थीम; गणपती मखरसाठी सुंदर आणि आकर्षक सजावट

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! दीड महिना कोरडा गेला, ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज, IMD ने काय दिला इशारा?

Political News : शिंदेंसेनेच्या नेत्याला अटक, घराबाहेर सापडली ड्रग्सने भरलेली बॅग; राजकारणात खळबळ

Pune Bank Scam : पुण्यात बँकेत महाघोटाळा! तब्बल ३४.७७ कोटींचा दरोडा; पोलिसांच्या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT