Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू; शौचालयाचे बांधकाम सुरू असताना घडली घटना

विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू; शौचालयाचे बांधकाम सुरू असताना घडली घटना

साम टिव्ही ब्युरो

अडावद (जळगाव) : आठवडे बाजार परिसरात सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरू असताना ३३ वर्षीय मजुराला मुख्य वाहिनीच्या वीज तारेचा (electric Shock) स्पर्श झाल्याने जोरदार धक्का बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वीज मंडळावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. (Live Marathi News)

अडावद (ता. चोपडा) येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवडे बाजार परिसरात ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. शौचालयावरून उच्च लघुदाब विद्युत वाहिनी गेलेली आहे. अशातच गुरुवारी (८ मे) दोन जण शौचालयाचे बांधकाम करीत होते. (jalgaon News) दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास रहेमान गफ्फार मण्यार (वय ३३, रा. अमळगाव, ता. अमळनेर, हल्ली मुक्काम अडावद, ता.चोपडा) या मजुराला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मजूराच्‍या अंगावर विद्युत तार पडली की त्याचा विद्युत तारेला स्पर्श झाला याबाबत मात्र विविध तर्क लावले जात आहेत. परंतु विद्युत वाहिनीमुळे मजुराचा जीव गेला याला जबाबदार कोण? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चोपडा (Chopda) उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT