महाराष्ट्र

धक्कादायक..एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळविले

धक्कादायक..एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळविले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात परिवार वास्‍तयास आहे. येथे दोन परिवार एकत्र राहतात. दोन भाऊंच्‍या परिवारात १६ वर्षाची आणि दोन १५ वर्षाच्या अशा तीन मुलींसह राहतात. गुरूवारी (९ सप्टेंबर) सकाळी दहा ते साडेअकराच्या सुमारास घरातल्‍या वाड्यातून तीनही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. तीनही मुलींचा पालकांनी नातेवाईकांकडे शोधा शोध केली. परंतू मुली कुठेच आढळून आल्या नाहीत.

पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्‍हा

दिवसभर शोधाशोध केल्‍यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला कलशात कोणत्या 7 वस्तू ठेवतात? जाणून घ्या योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: पंढरपूरची दीडशे वर्षांची ऐतिहासिक नगरपालिका होणार हेरिटेज वास्तू

Gauri Alankar: गौरीसाठी निवडा सुंदर अलंकार; गणेश चतुर्थीत सजावटीला मिळेल पारंपरिक आणि आकर्षक लूक

Railway News : रेल्वेचा प्रवास ठरणार त्रासदायक! रविवारी 'या' मार्गांवर ९ तासांचा मेगा ब्लॉक, लोकलसह अनेक गाड्या रद्द

Manoj Jarange : 'जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर...'; दिपकेंच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT