Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला कलशात कोणत्या 7 वस्तू ठेवतात? जाणून घ्या योग्य पद्धत

Surabhi Jayashree Jagdish

गणेश स्थापनेचं महत्त्व

गणपती बाप्पाला विघ्नहर्ता आणि शुभशकुनाचे प्रतीक मानलं जातं. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशपूजा केल्याने अडथळे दूर होऊन कार्य निर्विघ्न पार पडतं. गणेश चतुर्थीला घरी गणपतीची स्थापना करणे हे भक्तांसाठी बाप्पाचं भक्तिभावाने स्वागत करण्याचे प्रतीक मानले जाते.

Ganesh Chaturthi puja | saam tv

कोणत्या वस्तू अर्पण केल्या जातात?

गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा, मोदक, लाडू आणि लाल फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. या पूजाविधीनंतर आरती आणि मंत्रोच्चार केले जातात. गणपतीची स्थापना ही कुटुंबातील सुख, शांती, सलोखा आणि सकारात्मकतेची कामना करणाऱ्या परंपरेशी जोडलेली आहे.

Ganpati festival | saam tv

कलशाला विशेष महत्त्व का आहे?

हिंदू पूजापद्धतीत कलशाला देवतांचे प्रतीक मानलं जातं आणि गणपतीची स्थापना करण्यापूर्वी पूजास्थळ शुद्ध करून कलशाची स्थापना केली जाते. मातीचा, तांब्याचा किंवा पितळेचा कलश पाण्याने भरून त्यावर आंब्याची किंवा अशोकाची पाने आणि नारळ ठेवण्याची पद्धत आहे.

Ganpati puja items | saam tv

कलश कुठे आणि कसा ठेवावा?

गणेश स्थापनेच्या वेळी पूजास्थळ स्वच्छ करून कलश एका चौथऱ्यावर ठेवावा. कलश स्थापित करण्यापूर्वी पूजास्थळाची शुद्धी करून त्यात शुद्ध पाणी भरावं. त्यानंतर कलशात अक्षत, गंगाजल, सुपारी आणि एक नाणं ठेवावं.

seven items in Kalash | saam tv

कलशावर काय ठेवले जाते?

कलशाच्या तोंडावर आंब्याची किंवा अशोकाची पानं ठेवण्याची परंपरा आहे. या पानांवर एक नारळ ठेवला जातो आणि त्यानंतर कलशाजवळ गणपतीची मूर्ती स्थापित केली जाते. कलश आणि गणपतीची स्थापना झाल्यानंतर विहित विधींनुसार त्यांची पूजा, प्रार्थना आणि आरती केली जाते.

Kalash decoration | saam tv

कलशातील सात वस्तू कोणत्या?

या पद्धतीनुसार कलशात शुद्ध पाणी, अक्षता, गंगाजल, सुपारी, नाणं, आंब्याची किंवा अशोकाची पाने आणि नारळ यांचा समावेश होतो. यापैकी शुद्ध पाणी, अक्षत, गंगाजल, सुपारी आणि नाणे कलशात ठेवले जातात, तर पाने आणि नारळ कलशाच्या वरच्या भागात ठेवले जातात.

Ganesh Chaturthi rituals at home | saam tv

परंपरेनुसार कलश स्थापनेत बदल

कलश स्थापनेची पद्धत आणि त्यात ठेवण्यात येणाऱ्या वस्तू प्रदेश, घराणं आणि स्थानिक धार्मिक परंपरेनुसार थोड्या प्रमाणात बदलू शकतात. त्यामुळे काही कुटुंबांमध्ये कलशाच्या सजावटीत किंवा पूजाविधीतील वस्तूंमध्ये वेगळेपणा आढळतो.

Ganesh puja | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Digestion | saam tv
येथे क्लिक करा