जळगावात साडे पाच कोटीचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४ किलो सोनं आणि ३४ किलो चांदीचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालाचे कागदपत्र वाहन चालकाकडे होते. मात्र त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने हा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे येथून जळगावात येणाऱ्या वाहनातून ५ कोटी ५९ लाख ६१ हजारांचे सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकासह तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया करून हा साठा कोषागार कार्यालयात पाठविला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यानची ही मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी कारवाई केलेले हे वाहन पुणे येथून सोने-चांदी घेऊन जळगावात येत होते. जळगावातील सुवर्ण व्यावसायिकासह अन्य दोन असे एकूण तीन सुवर्ण व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालाचे कागदपत्र वाहन चालकाकडे होते. पण त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने हा सर्व सोनं-चांदीचा साठा पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.