जळगाव : सासु- सुनेचे भांडण..कामावर गेलेल्या पतीला फोन करुन समजावण्याच्या सुचना..पण, कामाच्या गडबडीत पतीचे दुर्लक्ष झाले. मात्र, त्यानंतर पायाला भिंगरी लावून बेपत्ता बायकोसह दिडवर्षीय बाळाला तो, शोधत सुटला. पोलिस दादपुकारा घेईना..मेहरुण तलाव, रेल्वेरुळ नको तीथं जावून पाहून आल्यावर काहीच उमजेना..रडकुंडीला आलेल्या या तरुणाने अखेर पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. गुन्हेशाखेच्या निरीक्षकांनी गांभीर्य ओळखत..यंत्रणा जुंपून बाळासह विवाहीतेला रात्रीतून शोधून काढले. (jalgaon-news-In-law-quarrel-but-father-craying-son-police-serching)
सास- बहु टिव्ही मालिका असो की, घरातील सासु- सूनेच भांडण हा नित्याचा प्रकार म्हणून प्रत्येक घरातील पुरूष मंडळी याकडे दुर्लक्ष करते. या वादातूनच मात्र मोठे गुन्हे घडतात. असाच किस्सा जळगाव शहरात घडला. खासगी कंपनीत नोकर विक्रांत जोगी (नाव काल्पनीक) यांच्या पत्नी भाग्यश्री हिचे सकाळी सासुबाईसोबत भांडण झाले. ‘तूमची आई माझ्याशी भांडतेय तुम्ही लवकर घरी या’ तिने फोन करुन घरी येण्याचा आदेश सोडला. नेहमीचाच प्रकार म्हणुन विक्रांतला कामाच्या ओघात विसर पडला. दोन तासांनी तो घरी आल्यावर दिड वर्षाची चिमुरडी आणि पत्नी भाग्यश्री घर सेाडून निघुन गेले. आईला विचारले तर, ‘हार’ घेवुन येते असे सागून तूझी बायको निघून गेल्याच तिने सांगतीले. कसले हार, अन् काय..काहीच उमजत नसल्याने विक्रांत सारखा पत्नीला फोन करत होता. मात्र, ती फोनच घेत नसल्याने याची पाचावर धारण बसली. वाईट विचार येवू लागल्याने त्याने धावतच पोलिस ठाणे गाठले. येथे बसलेल्या हवालदारांनी सर्व ऐकून घेतलं, आजच गेलीयं ना...येईल मग असे म्हणत तक्रार न घेता त्यालाच शोधायचा सल्ला देत पिटाळून लावले.
मृत्यूची ठिकाणांवर शेाध
‘हार’ आणयचे का?..म्हटली, फोन का घेत नाही..नातेवाईकांकडे, माहेरी..तर गेली नाही. पतीने बसस्टॅण्ड, रेल्वेस्थानक पालथे घातले. आत्महत्त्या तर केली नसावी या भितीने पती मेहरुण तलावाच्या काठी लोकांना विचारपुस करत सुटला. तांबपुरा खदान, विहिरीसह शिवाजी उद्यानातील पाण्याने भरलेल्या विहीरीकडे शोध घेतला. सापडतच नाही म्हणुन रेल्वेरुळावर पाहून आला. बायको गेल्याने पाण्याचा घोट जाईना. ईकडे पोलिसांची चहा- पाण्याची अपेक्षा, अखेर विक्रांतने तशाच अवस्थेत पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकालेंनी त्याची अवस्था पाहून घटनेचे गांभीर्य ओळखत संपुर्ण टिम दिडवर्षाचे बाळ आणि त्याची आई शोधण्यास लावली.
बायकोला झोपेतच गाठले..
गुन्हेशाखेच्या तांत्रिक टिमचे विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, संदिप सावळे अशांनी बेपत्ता महिलेचा शोधकार्य राबवून रात्री हि महिला धुळ्यात चुलत आजीच्या घरी असल्याचे शोधुन काढले. तिला न कळू देता विक्रांत जोगी यांनी पोलिसांच्या मदतीने माहिती नसलेले ते घर मध्यरात्री गाठले. पत्नीच्या कुशीत पहुडलेल्या लेकराला उचलून त्याचा मुका घेत बापाच्या डोळ्यातून अश्रु ढळू लागले. हात जोडतच त्याने निरीक्षक बकाले आणि त्यांचे टिमचे आभार व्यक्त करुन पाण्याचा घोट घेतला, तोपर्यंत भुक तहान विसरुन त्याच्यातला बाप बाळासह त्याच्या आईचा शोध घेत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.